Home महाराष्ट्र महामार्गावर भरधाव ट्रॅव्हल्स पलटी, भीषण अपघातात एक ठार आठ जखमी  

महामार्गावर भरधाव ट्रॅव्हल्स पलटी, भीषण अपघातात एक ठार आठ जखमी  

Wardha Accident:  नागपूर – हैदराबाद महामार्गावर छोट्या आर्वी शिवारातील सगुणा कंपनीजवळ भरधाव ट्रॅव्हल्स पलटल्याने भीषण अपघात झाल्याची घटना. या अपघातात एक प्रवासी ठार तर आठ जण जखमी.

Travels overturned on the highway, one killed and eight injured in a horrific accident

वर्धा: वर्ध्याच्या हिंगणघाट येथील नागपूर – हैदराबाद महामार्गावर छोट्या आर्वी शिवारातील सगुणा कंपनीजवळ भरधाव ट्रॅव्हल्स पलटल्याने भीषण अपघात झाला आहे

पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. रस्त्यावरील खड्डा चुकवताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅव्हल्स पलटी झाली.

या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे तर आठ जण यात जखमी झाले आहे. ट्रॅव्हल्स क्रमांक सी बी 19 – एफ 3366 ही हैदराबाद येथून रायपूरला चालली होती. ट्रॅव्हल्समधून 28 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तर पन्नासच्यावर प्रवासी ट्रॅव्हल्समध्ये असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

ट्रॅव्हल्स भरधाव वेगात हैद्राबादवरून रायपूरकडे जात असताना हिंगणघाट नजीक पोहचली. छोटी आर्वीजवळ महामार्गावर असलेल्या खड्डयांचा अंदाज चालकाला आला नाही. खड्डा चुकविताना चालकाचे ट्रॅव्हलवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रॅव्हल्स पलटी झाली. यात एक प्रवासी जागीच मृत्यू झाला.

गंभीर जखमी झालेल्याना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी हिंगणघाट पोलीस पोहचले असून तपास सुरू आहे.

Web Title: Travels overturned on the highway, one killed and eight injured in a horrific accident

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here