Home अहमदनगर “माझ्या मुलीचे जसे तुकडे केले तसेच तुकडे मी राहुलचे करणार” दर्शनाच्या आईची...

“माझ्या मुलीचे जसे तुकडे केले तसेच तुकडे मी राहुलचे करणार” दर्शनाच्या आईची संतप्त प्रतिक्रिया

Darshana Pawar Murder Case:  राहुल हंडोरेने दर्शना पवारची हत्या का केली याचं कारणही आले समोर.

the reason why Rahul Handore Murder Darshana Pawar also Came to light

अहमदनगर: दर्शना पवार हत्या प्रकरणात पोलिसांनी राहुल हंडोरेला अटक करण्यात आली असून दर्शनाची हत्या राहुल हंडोरेनेच केल्याची कबुली दिली असल्याचं पोलिसांनी सांगितलं. राजगडाच्या पायथ्याशी दर्शना पवारचा मृतदेह (Dead body) आढळून आला होता. त्यानंतर तिचा मित्र राहुल हंडोरे फरार झाला होता. त्याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे.

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवारच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. हत्येनंतर फरार झालेला मुख्य आरोपी राहुल हंडोरेला अटक केल्यानंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाबाबत माहिती दिली. यात त्यांनी राहुल हंडोरेने दर्शना पवारची हत्या का केली याचं कारणही सांगितलं. पुणे पोलीस अधीक्षक अंकित गोयल गुरुवारी (२२ जून) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

पोलीस म्हणाले, “आम्हाला सखोल तपास करण्यासाठी वेळ मिळालेला नाही. मात्र, प्राथमिक तपासात असं दिसतंय की, दर्शना पवारने राहुल हंडोरेला लग्नासाठी नकार दिला. त्यामुळे त्याने दर्शनाचा खून केला. दोघांचीही खूप जुनी ओळख आहे. आरोपीला राहुलला दर्शनाबरोबर लग्न करायचं होतं. दर्शनाने या लग्नाला नकार दिला म्हणून राहुलने खून केल्याची प्राथमिक माहिती आहे.” यानंतर दर्शना पवारच्या आईची आणि भावाची संतप्त प्रतिक्रिया समोर आली आहे.

दर्शना पवारच्या आईची प्रतिक्रिया:

“मला मुंबईला घेऊन जा. माझ्या दर्शनाचे जसे तुकडे केले तसेच त्या राहुलचे तुकडे मी करते. मी एकटीच तुकडे करेन मला कुणाचीच मदत नको. माझ्या मुलीची हत्या केली तशीच मला त्याची हत्या करायची आहे. मला माझ्या मुलीला न्याय द्यायचा आहे आणि मीच देईन तो न्याय. राहुल हांडोरेला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तो जिवंत रहायलाच नको. आणखी १० मुलींचं पुढे नुकसान व्हायला नको. माझी मुलगी गेली, तशी इतर कुणाची मुलगी जाऊ नये. त्यामुळे राहुल हांडोरेला फाशीच झाली पाहिजे.”

दर्शना पवारच्या भावाची प्रतिक्रिया

“राहुल हांडोरेला आमच्या ताब्यात द्या किंवा मारुन टाका त्याला.त्याला जिवंत सोडता कामा नये. त्याच्यामुळे माझ्या बहिणीला त्रास झाला आहे, त्याला मारा किंवा आमच्याकडे द्या एवढीच विनंती आहे सरकारला”

Web Title: the reason why Rahul Handore Murder Darshana Pawar also Came to light

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here