Home क्राईम संगमनेर घटना: फोटोचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीवर सतत पाच वर्ष अत्याचार

संगमनेर घटना: फोटोचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीवर सतत पाच वर्ष अत्याचार

Sangamner Crime:  पीडित मुलीसोबत काढलेल्या फोटोचा गैरफायदा घेत फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर सतत पाच वर्ष अत्याचार (Rape)  केल्याची घटना उघडकीस.

Rape of a minor girl for five years continuously by taking advantage of the Photo

संगमनेर:  मुलीसोबत काढलेल्या फोटोचा गैरफायदा घेत फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर सतत पाच वर्ष अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर सतत पाच वर्ष अत्याचार करणाऱ्या आरोपी विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलग पाच वर्ष या मुलीला धमकावत, घरच्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

विनोद दत्तू गडकरी (रा. पेमगिरी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) याच्याविरोधात १९ वर्षीय पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान 376, 376(2), (IN), 506 कलमान्वये व बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 चे कलम 4, 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे.

पीडित मुलीसोबत काढलेल्या फोटोचा गैरफायदा घेत फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी विनोद गडकरी याने पीडित तरुणीवर वयाच्या १४ व्या वर्षापासूनच तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर बळजबरीने अत्याचार करीत याबाबत कुठे तक्रार केली तर तुला आणि तुझ्या घरच्यांना जीवे ठार मारेल अशी धमकी आरोपीने दिल्याचे पीडित तरुणीने म्हटले आहे.

सदर अत्याचाराचा हा प्रकार सन 2018 पासून ते 19 जून 2023 पर्यंत सुरू होता. मूळची कोपरगाव येथील असलेली व सध्या 19 वर्षे वय असलेली ही तरुणी शिक्षणानिमित्ताने पेमगिरी येथे राहावयास आहे. पेमगिरी शिवारातील ठाकरवाडी रस्त्यावरील डोंगरात व संगमनेर शहरातील घुलेवाडी फाट्यावर असलेल्या एका कॅफेमध्ये अत्याचाराचा प्रकार घडण्याचे पीडित तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

पीडित तरुणीच्या तक्रारीची दखल घेत पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तालुका पोलीस ठाण्याचा पदभार असलेले प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक इस्माईल शेख याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Web Title: Rape of a minor girl for five years continuously by taking advantage of the Photo

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here