अहमदनगर: टँकरच्या टायर खाली चिरडून दुचाकीवरील महिलेचा मृत्यू
Ahmednagar Accident News: पेट्रोलच्या टँकरच्या टायर खाली चिरडून दुचाकीवरील एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना.
राहाता | Rahata: शहरातील कोपरगाव नाक्यावर पेट्रोलच्या टँकरच्या टायर खाली चिरडून दुचाकीवरील एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिचा पती जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सहा वाजता राहाता शहरात घडली.
या घटनेबाबत राहाता पोलिसात हरिचंद्र भिकाजी बर्डे राहणार कोल्हार खुर्द याने फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, गुरुवार दि.22 जून रोजी मी व माझी पत्नी ताराबाई बर्डे (वय 46) आम्ही दोघे माझी सावळीविहीर ता. राहाता येथे राहणारी मुलगी-राणी अजय रजपुत हिस भेटण्याकरीता हिरोहोंडा कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. एमएच- 17 एक 3811) वरुन गेलो होतो.
सायंकाळी 6 वाजता सुमारास राहाता पुलालगत शनिमंदीर कमानीजवळ राहाता या ठिकाणी भारत बेंझ कंपनीच्या टँकर (क्र. एमएच- 17 बी.वाय – 9519) वरील चालक रविंद्र शशिकांत पंडीत रा. शिर्डी, ता. राहाता याने त्याचे ताब्यातील टँकर भरधाव चालवुन तसेच रस्त्याचे परीस्थीतीकडे दुर्लक्ष करून माझी हिरोहोंडा कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल हिस पाठीमागुन धडक देवून माझी पत्नी तारा बर्डे हिचे मृत्युस व माझे दुखापतीस कारणीभूत ठरला आहे. या फिर्यादीवरुन राहाता पोलिसांनी टँकर ताब्यात घेऊन टँकरचालका विरोधात गुन्हा दाखल केला.
Web Title: Accident woman on a two-wheeler died after being crushed
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App