Home अहमदनगर रेखा जरे हत्या प्रकरण: आणखी दोघांना पोलिसांनी केली अटक

रेखा जरे हत्या प्रकरण: आणखी दोघांना पोलिसांनी केली अटक

Rekha Jare Murder case another two arrested by the police

अहमदनगर | Ahmednagar: सामाजिक कार्यकर्त्या व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे खून प्रकारनी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.

सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार असे अटक झालेल्याची नावे आहेत. आज दुपारी पारनेर न्यायालयात दोघांना हजर करण्यात येणार आहे. अशी माहिती तपासी अधिकारी अजित पाटील यांनी दिली आहे.

सोमवारी जातेगाव फाट्याजवळ ता.पारनेर येथे रेखा जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. या अगोदर तिघा जणांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. आता आणखी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा मुख्य सूत्रधार कोण आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत.

Web Title: Rekha Jare Murder case another two arrested by the police

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here