रेखा जरे हत्याकांड: बाळ ज. बोठे याला फरार असताना हैदराबाद वकिलावर आरोप निश्चिती
Ahmednagar Rekha Jare Murder Case Update: या प्रकरणाची सुनावणी येत्या सोमवारी २३ जानेवारी ला होणार, महिला अजूनही फरार.
अहमदनगर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील (Murder Case) आरोपी बाळ ज. बोठे याला फरार असतानाच्या काळात हैदराबाद येथे मदत करणारा वकील जनार्दन अकुला चंद्रप्पा याची गुन्ह्यातून वगळण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली. मंगळवारी (ता. १७) त्याच्याविरुद्ध आरोप निश्चितीही करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी येत्या सोमवारी (२३ जानेवारी) होणार आहे. जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात दहा जणांवर आरोप निश्चिती झाली आहे. पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी ही महिला अजूनही फरार आहे.
दरम्यान, हत्याकांडातील आरोपी सागर भिंगारदिवे व आदित्य चोळके यांनी वैद्यकीय व कौटुंबिक कारणामुळे जामीनावर सुटका करण्याची याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. मात्र, जिल्हा न्यायालयात आरोप निश्चितीसह अन्य प्रक्रिया सुरू झाल्याने खंडपीठाने दोघांनाही त्यांचे अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले. तसेच, येत्या सहा महिन्यांत जिल्हा न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली नाही, तर पुन्हा जामीनासाठी अर्ज करण्याची मुभा दिल्याची माहिती रुणाल जरे यांचे वकील सचिन पटेकर यांनी दिली.
Web Title: Rekha Jare Murder Case Baal J. While Bothe was absconding
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App