Home अहमदनगर Murder Case: रेखा जरे हत्याकांड प्रकरण: बाळ बोठेंचा जामीन अर्ज फेटाळला

Murder Case: रेखा जरे हत्याकांड प्रकरण: बाळ बोठेंचा जामीन अर्ज फेटाळला

Rekha Jare Murder case Bal Bothe's bail application rejected

अहमदनगर | Rekha Jare Murder Case: यशस्विनी महिला ब्रीग्रेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याचा बुधवारी जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावाला आहे.

बदनामी होण्याच्या भीतीने बोठे याने सुपारी देऊन रेखा जरे यांची हत्या घडवून आणली होती. ३० सप्टेंबर २०२० रोजी नगर पुणे रोडवरील जातेगाव घाटात गळा चिरून खून केल्याची घटना घडल्यानंतर बाळ बोठे १०० दिवसांनी पोलिसांच्या हाती लागला. बोठे याने जामिनासाठी १४ जुलै रोजी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता.

जरे यांच्या हत्याच्या संदर्भात सर्व पुरावे पोलिसांनी न्यायालयासमोर आणले. जामीन मिळाला तर आरोपी फरार होऊ शकतो. खुनाच्या घटनेनंतर अटकेच्या भीतीने बोठे शंभरपेक्षा जास्त दिवस तेलंगाना राज्यात लपून बसला होता. एकंदरीत आरोपीचे वर्तन लक्षात घेता त्याला जामीन देऊ नये असा सरकारी पक्षाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला होता.  

Web Title: Rekha Jare Murder case Bal Bothe’s bail application rejected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here