Home Accident News अकोले ब्रेकिंग: कार झाडावर आदळून भीषण अपघात, रेखा लाहोटी यांचे निधन

अकोले ब्रेकिंग: कार झाडावर आदळून भीषण अपघात, रेखा लाहोटी यांचे निधन

Akole News:  काजवे पाहून ‘संगमनेर कडे येत असताना कारचा झाडाला आदळून भीषण अपघात, महिलेचा मृत्यू.

Rekha Lahoti died in a terrible accident after the car hit a tree

अकोले:  काजवे पाहून ‘संगमनेर कडे येत असताना नवलेवाडी फाट्याजवळ झालेल्या अपघातात सौ. रेखा तुषार लाहोटी (वय ४१ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर तिघे जण जखमी झाले असून तिघांवर संगमनेर येथे प्राथमिक उपचार करून त्यांना पुण्याला हलविण्यात आले.

याबाबत माहिती अशी की परिवार सदस्यांचे संगमनेर येथे गेट टुगेदर झाल्यानंतर लाहोटी परिवार व त्यांचे नातेवाईक सर्व जण ६ कार मध्ये भंडारदरा परिसरात “काजवा महोत्सव” चा आनंद घेण्यासाठी गेले. काजव्यांचे मनोहारी दृश्य पाहून संगमनेर कडे परतत असतांना नवलेवाडी फाटा ता. अकोले येथे गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी झाडावर आदळून झालेल्या अपघातात सौ. लाहोटी यांचे जागेवर निधन झाले.

टाटा हॅरीअर कार क्र. एम एच १२ एस यु ८८८२ ह्या कार मधून मुकुंदनगर, पुणे येथील रहिवासी तुषार लाहोटी, सौ. रेखा लाहोटी, शिवप्रसाद लाहोटी व तन्वी लाहोटी हे चौघे प्रवास करत होते. तुषार लाहोटी हे गाडी चालवत परतत असताना ३ जुन रोजी पहाटे ३ च्या सुमारास ही घटना घडली. सोबत असलेल्या गाड्यातील नातेवाईक मदतीसाठी थांबले. तर मोठ्या आवाजामुळे परिसरातील नागरिक देखील मदतीला धावले.. दरम्यान सौ. रेखा लाहोटी यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान अन्य तिघांना गाडी बाहेर काढण्यात नातेवाईक व नागरिकांना यश आले.

तुषार लाहोटी, शिवप्रसाद लाहोटी व तन्वी लाहोटी या तिघांवर आरंभी भांडकोळी हॉस्पिटल, अकोले येथे व नंतर मेडीकव्हर हॉस्पिटल, संगमनेर येथे उपचार करून पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले. ते सध्या मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. मयत सौ. रेखा लाहोटी यांचे शव विच्छेदन घुलेवाडी (संगमनेर) येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Rekha Lahoti died in a terrible accident after the car hit a tree

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here