Home क्राईम प्रेमविवाह भंगला, पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीचीही रेल्वेपुढे आत्महत्या

प्रेमविवाह भंगला, पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीचीही रेल्वेपुढे आत्महत्या

Gondiya News:  प्रेम विवाह औटघटकेचा ठरत अल्पशा कालावधीनंतर भंगला, पत्नी ने बुधवारी (३१ मे) ला गोंदिया – चांदाफोर्ट रेल्वेसमोर आत्महत्या (Suicide) केली, त्या पाठोपाठ तिच्या पतीने सुध्दा रेल्वेपुढे उडी येत आत्महत्या.

Love marriage broke up, after wife's suicide, husband also committed suicide

गोंदिया : सडक अर्जुनी ग्रामीण भागात खळबळजनक घटना समोर आली आहे.  सडक अर्जुनी तालुका अंतर्गत येणाऱ्या ग्राम सौंदड येथे शुक्रवारी पतीने तर दोन दिवसापूर्वीच बुधवारी पत्नीने  रेल्वेसमोर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या पती पत्नीचा नुकताच जानेवारी महिन्यात प्रेम विवाह संपन्न झाला होता. मात्र, हा प्रेम विवाह औटघटकेचा ठरत अल्पशा कालावधीनंतर भंग झाल्याची घटना समोर आली आहे. पत्नी डीकेश्वरी दिगंबर भुसारी (१९) रा. सौंदड ने बुधवारी (३१ मे) ला गोंदिया – चांदाफोर्ट रेल्वेसमोर आत्महत्या केली होती. त्या पाठोपाठ तिच्या पतीने सुध्दा रेल्वेपुढे उडी येत आत्महत्या केली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  दिगंबर श्रावण भुसारी वय (२४) वर्ष रा.सौंदड ( सडक अर्जुनी) असे मृताचे नाव आहे. त्याची पत्नी सौ. डीकेस्वरी दिगंबर भुसारी वय (१९)  या महिलेने ३१ मे रोजी दुपारी  याच रेल्वे मार्गावर आत्महत्या केली होती. पत्नी नंतर आता पतीने आत्महत्या का केली याचा शोध पोलिस घेत आहेत. सदर अपघाताची माहिती रेल्वे विभागाचे कर्मचारी यांनी डूग्गीपार पोलिसांना दिली. सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात दिगंबर श्रावण भुसारी याचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे.  पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगंजुडे यांच्या मार्गदर्शनात घटनेचा तपास पोलीस हवालदार आनंद दामले, पोलिस नायक संजय चकोले, पोलिस शिपाई महेश धूर्वे करीत आहेत.

Web Title: Love marriage broke up, after wife’s suicide, husband also committed suicide

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here