Home क्राईम धक्कादायक! चॉकलेटच्या बहाण्याने चिमुरडीवर अत्याचार, घरमालकाच्या सतर्कतेने उघडकीस

धक्कादायक! चॉकलेटच्या बहाण्याने चिमुरडीवर अत्याचार, घरमालकाच्या सतर्कतेने उघडकीस

Nagpur Crime: तीन वर्षांच्या चिमुरडीवर एका व्यक्तीने बलात्कार (abused) केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

Child abused on the pretext of chocolate

नागपूर : नागपुरातील वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत तीन वर्षांच्या चिमुरडीवर एका व्यक्तीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

नरेंद्र धनराज वांधरे (वय ४९ वर्ष) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील मजूर काम करत आहेत. ते कुटुंबासह भाड्याच्या घरात राहतात. त्यांची आर्थिक परिस्थितीही हलाखीची आहे.

नरेंद्र तिच्या आई-वडिलांना ओळखत असे आणि त्यांच्या घरी येत जात असे. गेल्या गुरुवारी मुलीचे आई-वडील कामावर गेले होते. तिथे असताना ती आजीसोबत घरात खेळत होती. दरम्यान, आरोपी तेथे आला आणि त्याने मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने सोबत नेले.

आरोपीने मुलीला बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून घरमालक बाहेर आला. तिथे त्यांना आरोपी बाहेर निघताना दिसला. त्यानंतर त्यांनी ही माहिती मुलीच्या आई वडिलांना दिली. तिच्या आईने तिच्याकडे विचारपूस केली असता तिने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला.

यानंतर कुटुंबियांनी वाठोडा पोलिस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी नरेंद्रविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.  नागपूरमध्ये गुन्हेगारीमध्ये वाढ होताना दिसून येत आहे.

Web Title: Child abused on the pretext of chocolate

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here