Home बीड जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग; १८ दरवाजे उघडले, ५८ गावांना संभाव्य धोका

जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग; १८ दरवाजे उघडले, ५८ गावांना संभाव्य धोका

Jayakwadi Dam: पैठणचे जायकवाडी धरण ९० टक्के भरले.

Release of water from Jayakwadi Dam 18 doors opened

बीड: पैठणचे जायकवाडी धरण ९० टक्के भरले आहे. जास्त क्षमतेने भरल्याने धरणाचे १८ दरवाजे उघडले असून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. गोदावरी नदीवर असणाऱ्या बंधाऱ्यांना पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ५८ गावांना पुराचा संभाव्य धोका वर्तविण्यात आला आहे.

बीड  जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव तालुक्यातून ही गोदावरी नदी वाहत असल्यामुळे, गेवराई, माजलगावसह जालना  जिल्ह्यातील पाथरवाला परिसरात देखील पुराचा संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान गेवराई तालुक्यातील 32 गावांना तर माजलगाव  तालुक्यातील जवळपास 26 गावांना पाण्याच्या विसर्गात वाढ झाली तर पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे गावकऱ्यांनी नदीपात्रात उतरू नये असे आवाहन गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांच्यासह माजलगावच्या तहसीलदार वर्षा मनाळे यांनी केले आहे.

Web Title: Release of water from Jayakwadi Dam 18 doors opened

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here