Home महाराष्ट्र राज्यसभेत गदारोळ केल्याने १९ खासदार निलंबित

राज्यसभेत गदारोळ केल्याने १९ खासदार निलंबित

Rajya Sabha: तृणमूल काँग्रेसच्या सुष्मिता देव, डॉ. शांतनु सेन आणि डोला सेन यांच्यासह इतर राज्यसभा खासदारांचा समावेश.

19 MPs suspended for rioting in Rajya Sabha

नवी दिल्ली: राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार गदारोळ केल्याने १९ खासदारांना सभागृहातून एका आठवड्यासाठी निलंबित केल्याची कारवाई राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी कारवाई केली आहे.

सभागृहात खासदारांनी गदारोळ केला. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी उपसभापतींनी एका आठवड्यासाठी संबंधित खासदारांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

मिळालेली माहिती अशी की,  निलंबित केलेल्या खासदारांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सुष्मिता देव, डॉ. शांतनु सेन आणि डोला सेन यांच्यासह इतर राज्यसभा खासदारांचा समावेश आहे. या खासदारांनी सभागृहातील वेलमध्ये प्रवेश करून घोषणाबाजी केली. त्यामुळे या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

विरोधी पक्षांच्या १९ खासदारांवर निलंबनाची (MPs suspended) कारवाई केल्यानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी प्रतिक्रिया दिली. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी लोकशाहीलाच निलंबित केली आहे. तुम्ही खासदारांबद्दल काय बोलत आहात? संसदेचे कामकाज विरोधक नाहीत, तर सरकार रोखत आहे.

Web Title: 19 MPs suspended for rioting in Rajya Sabha

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here