Home अहमदनगर क्लासला जाणाऱ्या मुलीचा विनयभंग, दोन तरुणांवर गुन्हा

क्लासला जाणाऱ्या मुलीचा विनयभंग, दोन तरुणांवर गुन्हा

Ahmednagar News:  मुलीच्या फिर्यादीनुसार विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल.

A girl going to class was molestation

अहमदनगर: क्लासला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढली तसेच तिचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन तरुणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्शल मुळे व एक अनोळखी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दिल्लीगेट परिसरात शुक्रवारी ही घटना घडली.

शुक्रवारी दुपारी फिर्यादी अल्पवयीन मुलगी व तिची बहिण शहरातील एका क्लाससाठी जात असताना शहरातील एका खासगी होस्टेलवर राहणारे दोन तरूण त्यांच्या दुचाकीवरून पाठलाग करत होते. त्यांनी फिर्यादीकडे पाहून हावभाव करत मोबाईल नंबरची मागणी केली. घडलेला प्रकार फिर्यादीने घरी सांगितला. यानंतर पोलिसांत फिर्याद देण्यात आली आहे. तरूणांविरूध्द विनयभंग, पोक्सो आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: A girl going to class was molestation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here