Home पुणे Rape | गरोदर राहण्यासाठी आयुर्वेदिक गोळ्या देतो असे म्हणत महिलेवर वारंवार बलात्कार

Rape | गरोदर राहण्यासाठी आयुर्वेदिक गोळ्या देतो असे म्हणत महिलेवर वारंवार बलात्कार

Pune Rape Case: अश्लील फोटोची भीती दाखवून वारंवार बलात्कार.

Repeated rape of woman for giving Ayurvedic pills to get pregnant

पिंपरी: पिंपरी चिंचवड पोलिसांनी सोमवारी  बलात्कार प्रकरणी तक्रार दाखल करून घेतली आहे. एका महिलेने ५० वर्षीय पुरुषावर आरोप केला आहे. फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांच्या कालावधीत वारंवार बलात्कार करण्यात आला. आधी औषध देऊन महिलेची शुद्ध हरपत बलात्कार केला आणि नंतर अश्लील फोटो कडून धमकी देत वारंवार बलात्कार केला.

पिंपरी चिंचवडच्या भोसरी पोलीस ठाण्यात पीडित 25 वर्षीय महिलेनं बलात्कार प्रकरणी तक्रार दिली आहे. आपल्या तक्रारीत या महिलेनं आपल्यावर वारंवार बलात्कार करण्यात आल्याचा आरोप एका पुरुषावर केलाय. तसंच अश्लिल फोटोंची भीती दाखवत सतत आपल्यासोबत गैरकृत्य केल्याचंही म्हटलंय.

सदर महिलेने म्हंटले आहे की,  या पुरुषानं आपल्याला आयुर्वेदिक गोळ्या देत असल्याची बतावणी केली होती. या आयुर्वेदिक गोळ्यांमुळे गरोदर होण्यासाठी मदत होईल, असं म्हटलं होतं. या गोळ्यांसाठी तब्बल  90  हजार रुपये इतकी किंमतही आपण मोजल्याचं पीडितेनं म्हटलंय. दरम्यान, एक दिवस हा माणून गोळ्या घेऊन भोसरीतील आपल्या घरी आला.

या गोळ्या घेतल्यानंतर पीडितेला कोणतीही शुद्ध राहिली होती. त्यानंतर पुरुषाचा या गैरफायदा घेत आपल्यासोबत गैरप्रकार केल्याचं माझ्या लक्षात आल्याचं पीडितेनं म्हटलंय. मी बेशुद्ध झाल्यावर माझ्यावर बलात्कार करण्यात आला, असा आरोप या पीडितेनं केला आहे. तसंच त्याने माझे आक्षेपार्ह अवस्थेत फोटोही काढले, असंही पीडितेनं म्हटलंय.

Web Title: Repeated rape of woman for giving Ayurvedic pills to get pregnant

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here