Home संगमनेर संगमनेर: कत्तलीसाठी जाणाऱ्या २८ जनावरांची सुटका

संगमनेर: कत्तलीसाठी जाणाऱ्या २८ जनावरांची सुटका

Breaking News | Sangamner: कत्तलीसाठी डीवायएसपींच्या पथकाची कारवाई जाणाऱ्या २८ जनावरांना पोलिसांच्या प्रयत्नामुळे जीवदान.

Rescue of 28 animals going to slaughter

संगमनेर: कत्तलीसाठी डीवायएसपींच्या पथकाची कारवाई जाणाऱ्या २८ जनावरांना पोलिसांच्या प्रयत्नामुळे जीवदान मिळाले आहे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने काल गुरुवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील कोल्हेवाडी परिसरात कारवाई करून या जनावरांना जीवदान दिले.

एका वाहनांमधून कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणावर वासरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांना गुप्त खबऱ्यामार्फत समजली. त्यांनी आपल्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले यानंतर पोलीस पथकाने कोलेवाडी येथे जाऊन ही कारवाई केली. या पोलीस पथकाला कोल्हेवाडी परिसरामध्ये एका वाहनांमध्ये निर्दयतेने वासरे बांधून ठेवली असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी या वाहनाला अडवून चौकशी केली असता या वाहनांमध्ये तब्बल २८ वासरे बांधून ठेवण्यात आलेली होती. सदर वासरे हे. कत्तलीसाठी नेण्यात येत होती. पोलिसांनी सर्व वासरांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी पांजरपोळ येथे केली. रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. राज्यात गोहत्या बंदी कायदा अस्तित्वात असतानाही संगमनेर शहरात मात्र या कायद्याचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. संगमनेर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनावरांची कत्तल केली जात आहे. पोलिसांनी अनेकदा कारवाया करूनही शहरातील कत्तलखाने सुरू आहेत या कत्तल खाण्यासाठी ग्रामीण भागातून जनावरे आणले जातात. कोल्हेवाडी येथे कारवाई केल्याने २८ वासरांना जीवदान मिळाले आहे. ही वासरे कोणाच्या मालकीची होती व कत्तलीसाठी कोणत्या गावाला चालले होते याचा तपास पोलीस करत आहेत. मागील आठवड्यात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कत्तलखान्यावर कारवाई केली होती. यानंतर लगेच शहर पोलिसांनी कारवाई केली होती.

Web Title: Rescue of 28 animals going to slaughter

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here