Home अकोले भारतीय जनता पार्टी अकोले तालुक्याच्या वतीने आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग कार्यक्रमास अतिशय...

भारतीय जनता पार्टी अकोले तालुक्याच्या वतीने आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग कार्यक्रमास अतिशय उस्फुर्त प्रतिसाद

BJP Akole

अकोले:  येथील के बी दादा देशमुख सभागृहात कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. छत्रपती शिवराय, घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर, जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रारंभ करण्यात आले. उदघाटन माजी आमदार वैभवराव पिचड यांचे हस्ते करण्यात आले. स्वागत व प्रास्तविक तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी केले.

प्रथम सञात माजी जिल्हाध्यक्ष रविकाका बोरावके यांनी भारताची वैचारिक मुख्यधारा भाजपाचा इतिहास व पक्षाची कार्यपद्धती व संघटनात्मक भुमिका या विषयावर मार्गदर्शन करताना पहिल्या लोकसभेत जनसंघाचे विरोधी पक्षनेते पद होते पण आज काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद सुध्दा नाही अशी अवस्था झाली असून शहबानो ते तीन तलाक रद्द करण्यापर्यंत चा इतिहास मांडला. यावेळी अध्यक्षस्थानी वसंतराव मनकर हे होते. व्दितीय सञात प्रदेश कार्यकारणी सदस्य व माजी जिल्हाध्यक्ष भानुदासजी बेरड सर यांनी आत्मनिर्भर भारत या विषयावर मार्गदर्शन करताना दोन खासदार ते तिनशे तीन खासदार असा प्रवास करताना नरेंद्र मोदी यांनी चीन, पाकिस्तान सह शत्रू ला धडा शिकविण्यात मागे पुढे पहाणार नाही. यावेळी जिप गटनेते जालिंदर वाकचौरे हे होते. तिसऱ्या सत्रात सोशल मिडीया सेलचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अंतुजी वारूळे यांनी सोशल मिडीयावर मार्गदर्शन केले अध्यक्षस्थानी जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव होते चौथ्या सञात भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव लक्ष्मण सावजी यांनी २०१४ नंतरचा भारत व अंतोदय या विषयावर मार्गदर्शन करताना जगाच्या राजकारणात भारताचे नाव अग्रभागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेले. केंद्र सरकारच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवून लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे असेही सांगितले. अध्यक्षस्थानी अकोले एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष जे. डी. आंबरे हे होते.

समारोप अनुसुचित जनजाती समिती महाराष्ट्र प्रदेश संघटन महामंञी किशोर काळकर व जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी केले. जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी गोंदकर यांनी संपुर्ण जिल्हात अकोले तालुक्यातील सर्वात छान कार्यक्रम झाला. उपस्थित बद्दल कौतुक व अभिनंदन केले. सुञसंचालन सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. उपसभापती दत्ता देशमुख, महीला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. सोनालीताई नाईकवाडी, आदिवासी आघाडी चे जिल्हाध्यक्ष विजय भांगरे, सरचिटणीस यशवंतराव आभाळे, मच्छिन्द्र मंडलिक, उपाध्यक्ष काशिनाथ साबळे, सुभाष वाकचौरे, गणेश पोखरकर,सुभाष बेनके, बाबासाहेब आभाळे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, महिला आघाडी तालुकाध्यक्ष शारदा गायकर, वैशाली जाधव, शहराध्यक्ष सचिन शेटे,  शेतकरी आघाडी चे तालुकाध्यक्ष अविनाश तळेकर, अल्पसंख्याक आघाडी चे अध्यक्ष नाजीम शेख, सहकार आघाडी चे तालुका संयोजक सोमनाथ मेंगाळ, भटक्या जमाती सेल चे भास्कर एलमामे आदी उपस्थित होते. सर्व नुतन पदाधिकारी यांचे सत्कार करण्यात आला. मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. नावनोंदणी उपक्रम सुशांत वाकचौरे, मच्छीन्द्र चौधरी, ज्ञानेश पुंडे, हितेश कुंभार यांनी राबविला. सर्व सत्रात वैभवराव पिचड, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर हे सर्व स्टेज वर न बसता समोर बसून पूर्णवेळ बसून सर्व सत्रात उपस्थित राहिले. भाजपा हा शिस्तीचा पक्ष असल्याचा प्रत्यय आला.

Web Title: Response to the worker training class program organized by BJP Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here