Home अकोले Akole: अकोले तालुक्यात आज ८ करोनाबाधित वाढले

Akole: अकोले तालुक्यात आज ८ करोनाबाधित वाढले

Akole taluka 8 Coronavirus infected Today

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ३०२४ इतकी झाली आहे.

आज तालुक्यात एकूण ९६ चाचण्या घेण्यात आल्या यामध्ये ७ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे तर खासगी प्रयोगशाळेतून एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात राजूर येथील ५२ वर्षीय पुरुष, २६ वर्षीय तरुणी, डूबरेवाडी सिन्नर येथे ५२ वर्षीय पुरुष, कोतूळ येथे ५५ वर्षीय महिला, सुगाव बुद्रुक येथे ४४ वर्षीय पुरुष, अकोले येथे ५३ वर्षीय पुरुष, कळस बुद्रुक येथे ४४ वर्षीय पुरुष, लिंगदेव येथे २९ वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची संख्या ३०२४ वर पोहोचली आहे. रविवारी दोन करोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले होते.

Web Title: Akole taluka 8 Coronavirus infected Today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here