Home क्राईम मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बाप बुरखा घालून न्यायालयात आला अन…

मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बाप बुरखा घालून न्यायालयात आला अन…

Jalgaon Crime News:  मुलाच्या खुनाचा (Murder) बदला घेण्यासाठी बाप बुरखा घालून न्यायालयात पोहोचला अन गोळीबार करून संपवण्याचा प्रयत्नात असलेल्या बापाला पोलिसांनी अटक केली.

revenge the murder of his son, the father came to the court wearing a veil and

जळगाव: मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बाप बुरखा घालून न्यायालयात पोहोचला अन गोळीबार करून संपवण्याचा प्रयत्नात असलेल्या बापाला पोलिसांनी अटक केली.

पोलिसांच्या सतर्तकतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे, या घटनेत कुणालाही संशय येवू नये म्हणून दोघा संशयितांनी मुस्लिम महिलाचा पेहराव केला होता. त्याप्रमाणे बुरखा  घालून न्यायालय परिसरात दबा धरून बसले होते. मात्र त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांचा खून करण्याचा असफल केला. या घटनेत एका जणाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 5 जिवंत काडतूस आणि  गावठी कट्टा जप्त केला आहे. मनोहर दामू सुरळकर (वय 45) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटल्यानंतर वडिलांसोबत घरी जात असलेल्या धम्मप्रिय मनोहर सुरळकर (वय 19 रा. पंचशील नगर, भुसावळ) या तरुणाची गोळीबार तसेच चाकूने हल्ला करत निर्घृणपणे हत्या केल्याची घटना 22 सप्टेंबर 2021 रोजी जळगाव तालुक्यातील  नशिराबाद येथे राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली घडली होती. या घटनेत मयत धम्मदिप याचे वडील मनोहर दामू सुरळकर (वय 45) हे जखमी झाले होते. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शेख समीर उर्फ भांजा शेख जाकीर (वय-२१) आणि रेहानुद्दीन नईमोद्दीन (वय-२१) दोन्ही रा. पंचशिल नगर, भुसावळ या दोघांना अटक करण्यात आली होती. अटक झाल्यापासून ते कारागृहातच होते.

आज या खटल्याची तारीख असल्याने शेख समीर व रेहानुद्दीन नईमोद्दीन या दोघांना आज जळगाव कोर्टात हजर करण्यात येणार होते. याची माहिती मयत धम्मदीप याचे वडील मनोहर सुरळकर यांना मिळाली. मुलाचा खुनाचा राग त्यांच्या डोक्यात कायम असल्याने त्याचा बदला घेण्यासाठीच, आज मुलाचा खून करणाऱ्या दोघांना संपविण्याचा त्यांनी प्लॅन रचला  होता, त्यानुसार मनोहर सुरळकर व सुरेश रवी इंधाटे हे कुणालाही संशय येवू नये, म्हणून दोघे चक्क बुरखा घालून मुस्लिम महिलांच्या पेहरावात कोर्ट परिसरातल्या मंदिराजवळ बसले होते.

मंदिराजवळ बसलेल्या या मुस्लिम पेहरावातील दोघांना पाहून पोलिसांच्या एका खबर्‍याला संशय आला. त्याने याबाबतची माहिती शहर पोलीस स्थानकाला दिली. यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तेजस मराठे, योगेश इंधाटे, गजानन बडगुजर, उमेश भांडारकर, शहर वाहतूक शाखेचे परमेश्वर जाधव यांनी कारवाई केली.  गोळीबार करून खून करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना अटक केली. आपण आपल्या मुलाचा बदला घेण्यासाठी येथे आलो असल्याची कबुली मनोहरने दिली आहे.

Web Title: revenge the murder of his son, the father came to the court wearing a veil and

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here