Home क्राईम खळबळजनक! युवतीवर अत्याचार करून भोसकून खून

खळबळजनक! युवतीवर अत्याचार करून भोसकून खून

Nashik Crime News:  युवतीवर अत्याचार (abused) करून धारदार शस्त्राने तिचा भोसकून खून (Murder) केल्याची घटना.

Murder Case girl was abused and stabbed to death

नाशिक : इगतपुरी तालुक्यातून धक्कादायक घटना उघडकीस आले आहे. युवतीचा मृतदेह आढळून आल्याने तालुका हादरला आहे. युवतीवर अत्याचार करून धारदार शस्त्राने तिचा भोसकून खून केल्याची घटना घडली आहे.

इगतपुरी तालुक्यातील पूर्व भाग असलेल्या अडसरे बु. येथील शेतशिवारात तीन दिवसांपूर्वी एका युवतीचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, या युवतीवर अत्याचार करून धारदार शस्त्राने तिचा भोसकून खून करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून कसून चौकशी केली जात असल्याची माहिती घोटी पोलिस ठाण्याच्या वतीने देण्यात आली. या घटनेने तालुका हादरला असून, घटनेमुळे पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. मृत युवतीची आई सीताबाई चौरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Murder Case girl was abused and stabbed to death

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here