Home अकोले संगमनेर: निळवंडे उजव्या कालव्यातून 22 जानेवारीला आवर्तन

संगमनेर: निळवंडे उजव्या कालव्यातून 22 जानेवारीला आवर्तन

Breaking News | Sangamner: निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याबाबत सर्व तांत्रिक काम पूर्ण. (Nilawande right canal).

Reversal on 22nd January from Nilawande right canal

संगमनेर: निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याबाबत सर्व तांत्रिक काम पूर्ण झाली असल्याचे अभियंत्यांनी सांगितले. त्यानुसार असे कीर्तन आयोध्येतील प्रभू श्रीराम मंदीराच्या उद्घाटन सोहळ्याच्या मुहूर्तावर निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. प्रवरा डावा कालव्यातून तसेच मुळा उजव्या कालव्या मधून सोमवारपासून आवर्तन सोडण्याच्या त्यांनी जलसंपदा विभागाला दिल्या.

मंत्री विखे म्हणाले, की राहुरी तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचेल यासाठी दीड टीएमसी पाण्याचा वापर करण्यात येईल. प्रवरा धरण समूहातील उपलब्ध पाण्याचा साठा लक्षात घेऊन रब्बी हंगामातील पिकांसाठी सोमवारपासून आवर्तन सोडण्यावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातूनही पाणी सोडण्याची कार्यवाही सोमवारपासून करण्याबाबतही विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मंत्री विखे यांनी दिले. गोदावरी लाभक्षेत्राचे आवर्तन आताच चांगल्या पध्दतीने झाले. सुयोग्य नियोजन झाल्याबद्दल त्यांनी अधिकार्यांचे अभिनंदन केले.

विखे पाटील यांच्या अध्यक्षे- तेखाली संगमनेर येथील उपविभागीय कार्यालयात जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक सपंन्त्र झाली. बैठकीस नाशिक जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली शहाणे, अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, प्रांताधिकारी शैलेश हिंगे, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, मुळा लाभक्षेत्राच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, प्रवरा लाभक्षेत्राचे स्वप्नील काळे, निळवंडे उर्ध्व प्रवरा प्रकल्पाचे अभियंता कैलास ठाकरे, कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे आदी अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान रब्बी हंगामातील सिंचन व बिगर सिंचन आवर्तनासाठी आज सोमवार दिनांक १५ जानेवारी २०२४ रोजी सकाळी सहा वाजता निळवंडे धरणातून सुमारे १४०० कुसेक्स इतका पाणी विसर्ग प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आल्याची माहिती इंजिनियर हरीशचंद्र  चकोर यांनी दिली आहे. 

Web Title: Reversal on 22nd January from Nilawande right canal

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here