संगमनेर: डीजे वाहन चालकाच्या दुर्घटनेतील युवकाचा मृत्यू
Breaking News | Sangamner Accident: डीजे वाहनचालकाचे नियंत्रण सुटून अचानक वेग वाढल्याने वरातीतील १० ते १२ जणांना चिरडल्याची घटना. युवकाचा आज मृत्यू.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द गावात झालेल्या दुर्घटनेतील आणखी एक जीव आज आपल्याला सोडून गेला आहे. गावातील एक गरीब व मितभाषी व्यक्तिमत्व ज्याच्या जीवावर सर्व प्रपंचाची धुरा होती अशा तरुणाचा मुंबई येथे उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. डीजे वाहनचालकाचे नियंत्रण सुटून अचानक वेग वाढल्याने वरातीतील १० ते १२ जणांना चिरडल्याची घटना घडली होती. यामध्ये जखमी झालेल्या अभिजित संतोष ठोंबरे वय २२ याचे आज पहाटे पाच वाजता निधन झाले आहे. त्याचा अंत्यविधी सोमवार दि, १५ संध्याकाळी आज रात्री ९:०० धांदरफळ खुर्द येथे होणार आहे.
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे दुर्दैवी घटना घडली आहे. नवरदेव लग्नासाठी धामधूम वरातीत निघाला असताना बेधुंद झालेल्या डीजे वाहनचालकाचे नियंत्रण सुटून अचानक वेग वाढल्याने वरातीतील १० ते १२ जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटना दिनांक ४ जानेवारी गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. जखमींना तातडीने संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले होते.
नवरदेवाची घरापासून मिरवणूक सुरु असताना ही दुर्घटना घडली आहे. नवरदेवाची पाठवणी सुरु असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. डीजे चालकाने अचानक वेग वाढविल्याने वराती मंडळी चाकाखाली चिरडली गेली. या अपघातात बाळासाहेब हरिभाऊ खताळ वय २५ रा. धांदरफळ खुर्द, भास्कर राघू खताळ वय ३७ रा. धांदरफळ खुर्द यांचा मृत्यू झाला आहे. तर रामनाथ दशरथ काळे, अभिजित संतोष ठोंबरे, सोनाली बाळासाहेब खताळ अशा संजय खताळ हे जखमी झाले आहेत. यामधील तिघांची प्रकृती गंभीर होती. यामधील युवकाचा मृत्यू झाल्याने तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
Web Title: Youth dies in DJ driver’s accident
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News