अकोले: संक्रातीच्या दिवशी पाझर तलावामध्ये बुडून शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू
Breaking News | Akole: नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा दुपारी दीड वाजेच्या सुमारास पाण्यात बुडून मृत्यू. (Dies)
अकोले: घराच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या पाझर तलावामध्ये अंघोळीला गेलेला शिवराज रामदास वैद्य (वय १५) या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा दुपारी दीड वाजेच्या सुमारास पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना काल मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशीच घडल्यामुळे सुगाव गावावर शोककळा पसरली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवराज हा मॉडर्न हायस्कूल मध्ये इ. ९ वी मध्ये शिक्षण घेत होता. काल मकर संक्रातीच्या दिवशी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घराच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या पाझर तलावामध्ये अंघोळीला गेला आणि बंधाऱ्यातील पाण्यात उतरल्यावर बंधाऱ्यातील गाळात रुतून बसला अन पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेतली मात्र फार उशीर झाला होता. अकोले पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तो सुगावच्या ज्ञानेश्वर दूध संस्थेचे माजी चेअरमन, सामाजिक कार्यकर्ते रोहिदास गणपत वैद्य यांचा नातू व प्रगतिशील शेतकरी रामदास वैद्य यांचा मुलगा होता. त्याच्यावर सुगाव येथे स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Web Title: School student dies after drowning in Pazar lake
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News