संगमनेरात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा
Breaking News | Sangamner: बंदी असलेल्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दोघाजणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
संगमनेर : बंदी असलेल्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दोघाजणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून एकूण १३ हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे.
जुबेर इब्राहीम अत्तार (रा. कुंभार आळा, संगमनेर) हा नायलॉन मांजा विक्री करताना आढळून आला आहे. त्याच्याकडून ७ हजार रुपयांचा नायलॉन मांजा पोलिसांनी जप्त केला आहे.
तसेच कोल्हेवाडी रोड येथे मुजफ्फर पापाभाई तांबोळी (रा. कोल्हेवाडी रोड, संगमनेर) हा नायलॉन माजा विक्री करताना आढळून आला आहे. त्याच्याकडून ६ हजार रुपयांचा नायलॉन मांजा पोलिसांनी जप्त केला आहे. या दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल अजित कुन्हे व विशाल कर्पे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता १८८, ३३६, सह पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार लोखंडे करत आहेत.
Web Title: Crime against two people selling nylon manja in Sangamaner
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News