Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग!  कार चालकाने तिघांना उडविले, एक ठार; दोन महिला जखमी

अहमदनगर ब्रेकिंग!  कार चालकाने तिघांना उडविले, एक ठार; दोन महिला जखमी

Breaking News | Ahmednagar: उड्डाणपूल परिसरात काल एका चारचाकी गाडीने दुचाकीस्वारास उडविले. दुचाकी चालकाचा मृत्यू.

driver of the car hit three, killing one

श्रीरामपूर: शहरातील नेवासा रोडवरील रेल्वे उड्डाणपूल परिसरात काल एका चारचाकी गाडीने दुचाकीस्वारास उडविले. त्यामध्ये दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. तर त्याच गाडीने गांधी पुतळा परिसरात दोन महिलांना उडविले. यामध्ये या दोन्ही महिला जखमी झाल्या आहेत. त्यातील एका महिलेला उपाचारासाठी लोणी येथे पाठविण्यात आले आहे. या प्रकरणातील चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महिन्द्रा एक्सयुव्ही कार (एमएच २० सीएच ७५७८) च्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने त्याने रेल्वे उड्डाण पूल परिसरातील मोटारसायकल चालक युनूस अब्दुल सय्यद (वय ५०) यांना जोराची धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना जमलेल्या नागरिकांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले, परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

या आगोदर याच कारचालकाने गांधी पुतळा परिसरात दोन महिलांना अक्षरशः सिनेस्टाईल उडवून दिले. या अपघातात स्वाती वाकचौरे आणि शशिकला रणदिवे या दोन महिलाही जखमी झाल्या आहेत. त्यांनाही उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सदर कार चालक अनिकेत एकनाथ कांबळे (वय- २४) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर कारही पोलीस ठाण्यामध्ये आणली आहे.

याप्रकरणी अनिस शाह यांनी दिलेल्या फिर्यादिवरून चालक अनिकेत कांबळे याच्याविरुध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: driver of the car hit three, killing one

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here