Home अहमदनगर लोणीत बिबट्याने घेतला नऊ वर्षीय मुलाचा बळी

लोणीत बिबट्याने घेतला नऊ वर्षीय मुलाचा बळी

Breaking News | Loni: बिबट्याच्या हल्ल्यात् ९ वर्षाच्या मुलाचा मृत्यू.

nine-year-old boy was killed by a butter leopard

लोणी: राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक गावातील संगमनेर रस्त्यावरील पद्मभूषणनगर मधील गोसावी वस्तीजवळ रविवारी सायंकाळी बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात अथर्व प्रवीण लहामगे या ९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने लोणी परिसर हादरून गेला आहे.

प्रवरा रुग्णालयासमोरील पद्मभूषण नगरमध्ये रहिवासी भागात काही मुलं सायंकाळी खेळत होते. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अथर्व मुलांसोबत खेळून घराकडे जात असताना मकाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून मकाच्या शेतात ओढून नेले, अंधार पडला तरी अथर्व घरी आला नाही म्हणून घरच्यांनी त्याचा शोध सुरू केला. त्याच्या मित्रांकडे चौकशी केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अथर्वचे कुटुंबीय व अनेक नागरिकांनी पुढे येत शेतात शोध घेतला असता रात्री दहाच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला. बिबट्याच्या हल्ल्याने त्याचे संपूर्ण शरीर रक्ताने माखून गेले होते. या घटनेने लोणी परिसर हादरून गेला. सरकारला माणसांपेक्षा बिबटे महत्वाचे असल्याने लोकभावना तीव्र झाल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून या भागात बिबट्याचे वास्तव्य असताना वन विभागाने गांभीर्याने न घेतल्याने अथर्वचा बळी गेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे याच परिसरात अनेक महाविद्यालये असल्याने विद्यार्थी मोठ्या संख्येने येथे राहतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची? उपवन सरक्षक अधिकारी सुवर्णा माने, वन परिक्षेत्र अधिकारी सुनील केदार, सहाय्यक उपवन संरक्षक अधिकारी संदीप पाटील यांच्यासह वन कर्मचारी, प्राणी मित्र विकास म्हस्के यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. नरभक्षक झालेला बिबट्या जेरबंद करण्यासाठी नाशिक, पुणे, संगमनेर येथील टीम दाखल झाल्या आहेत. ड्रोन कॅमेऱ्यामार्फत बिबट्याचा शोध घेण्यात येत आहे. पिंजरे लावण्यात आले आहेत.

पुढच्या काही दिवसात हा बिबट्या जेरबंद होईलही. वन विभाग लहामगे कुटुंबाला आर्थिक मदतही देईल पण या कुटुंबाने गमावलेला अथर्व मात्र पुन्हा येणार नाही.

Web Title: nine-year-old boy was killed by a butter leopard

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here