Home अहमदनगर मकरसंक्रांतीच्या दिवशी नगर हादरले, चाकूने संपविले तरुणाला

मकरसंक्रांतीच्या दिवशी नगर हादरले, चाकूने संपविले तरुणाला

Breaking News | Ahmednagar Murder:  वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि यातूनच एका तरुणाचा खून.

On the day of Makar Sankranti, the city shook, a young man was killed with a knife

अहमदनगर: मकर संक्रांतीच्या दिवशी नगर शहरात मध्ये दोन तरुणांमध्ये वाद झाला आणि या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि यातूनच एका तरुणाचा खून झाल्याची घटना घडली आहे. एमआयडीसी परिसरात हा प्रकार घडला.

शुभम अशोक सोनवणे (वय- २४, राहणार चेतना कॉलनी) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून बंटी उर्फ किरण प्रकाश पाडोळे राहणार दूध डेरी चौक याचा भाऊ रोहित पाडोळे हा सोमवारी सायंकाळी एमआयडीसीतील दूध डेरी चौकात चिकन दुकानात चिकन आणण्यासाठी गेला होता. तेथे असलेल्या शुभम सोनवणे सोबत त्याचे वाद झाले याची माहिती रोहितने आपला भाऊ बंटी पाडोळे याला दिली.

बंटी यांनी चाकूसोबत घेऊन जात शुभम कडे गेला आणि रोहित सोबत वाद घालून त्याला शिवीगाळ केल्याचा राग मनात धरत बंटीने शुभम सोनवणेवर चाकूने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले.

जखमी शुभम सोनवणे याला स्थानिकांनी विळद घाटातील रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथे त्याला डॉक्टरने मृत घोषित केले. मारहाण करणारा बंटी पाटोळे हा देखील जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: On the day of Makar Sankranti, the city shook, a young man was killed with a knife

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here