Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: दोन दिवसात तीन अल्पवयीन मुलींना पळविले

अहमदनगर ब्रेकिंग: दोन दिवसात तीन अल्पवयीन मुलींना पळविले

Breaking News | Ahmednagar: दोन दिवसांत तीन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याच्या घटना.

Three minor girls were abducted in two days

अहमदनगर: दोन दिवसांत तीन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलींच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन तर भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिंगार शहरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला (वय १५) रविवारी राहत्या घरातून अज्ञात व्यक्तीने पळवून नेले. नातेवाईकांच्या हा प्रकार लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी मुलीचा शोध घेतला. परंतू ती मिळून आली नाही. त्यानंतर आईने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके करत आहेत.

नगर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला (वय १२) अज्ञात व्यक्तीने शनिवारी पळवून नेले. मुलीच्या वडिलांनी रविवारी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ करीत आहेत. तिसरी घटना नगर तालुक्यातील एका गावात घडली. शनिवारी संबंधीत अल्पवयीन मुलीला (वय १३) अज्ञात व्यक्तीने पळवून नेले. मुलीच्या आईने रविवारी दुपारी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हंडाळ करीत आहेत.

Web Title: Three minor girls were abducted in two days

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here