संगमनेरात दरोडा – पिता पुत्र गंभीर जखमी
संगमनेरात दरोडा – पिता पुत्र गंभीर जखमी
संगमनेर: शहरातील जैन कॉलनीत राहणाऱ्या व्यापार्याच्या घरावर अज्ञात चार चोरट्यांनी आज शनिवार पहाटे २.३० च्या सुमारास दरोडा टाकला. यावेळी चार चोरट्यांना प्रतिकार करणाऱ्या पिता पुत्रांना चोरट्यांनी धारदार शस्त्राने वार केल्याने ते गंभीर झाले आहेत. या दरोड्यात चोरट्यांनी सुमारे दीड ते दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी कि, जैन कॉलनीत राहणाऱ्या भरतकुमार बाबूलाल मेहता वय ६० व अतिश भरतकुमार मेहता वय ३७ हे रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून झोपले असता अज्ञात चोरट्यांनी रात्री २.३० वाजेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाला होल पाडून आत प्रवेश केला. बेडरूम मध्ये चोरट्यांनी सामानाची उचका पाचक सुरु केली. यावेळी आवाजाने जागे झालेल्या घरातील व्यक्तींना या चोरट्यांनी मारहाण सुरु केली.
यावेळी चोरट्यांचा प्रतिकार करत असताना भारतकुमार बाबूलाल मेहता यांच्या चेहर्यावर चोरट्याने धारदार शस्त्राने वार केले. यावेळी मुलगा अतिश मेहता याने एका चोरट्याला धरून ठेवले. मात्र दुसर्या चोरट्याने आतिश यांच्यावरही वार केल्याने ते रक्तबंबाळ होत गंभीर जखमी केले. यावेळी चोरटे व मेहता परिवार यांच्यात जोरदार झटापटी झाल्याने चोरट्यांनी मेहता पिता पुत्रांच्या गळ्यातील सुमारे पाच तोळे सोन्याची चैन व रोख रक्कम असा ऐवज लुटून पोबारा केला. यानंतर मेहता परिवारातील सदस्यांनी आरडाओरड केली. शहर पोलिसांना या घटनेची माहिती दिली नागरिकांनी जखमी पिता पुत्रांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती पोलिसांना समजल्यावर शहर पोलीस निरीक्षक अभय पारमार हे कर्मचार्यांसह घटनास्थळी दाखल झाले.घटनेचा पंचनामा करण्यात आला. पोलिसांनी या घटनेचा तत्काळ शोध सुरु केला मात्र अद्याप पर्यंत कोणताही सुगावा लागला नाही.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.