Home संगमनेर संगमनेर: अज्ञात वाहनाच्या धडकेत पिता ठार , मुलगी गंभीर

संगमनेर: अज्ञात वाहनाच्या धडकेत पिता ठार , मुलगी गंभीर

संगमनेर: अज्ञात वाहनाच्या धडकेत पिता ठार , मुलगी गंभीर

राजापूर: कॉलेज मध्ये शिकणाऱ्या आपल्या मुलीला वरून घरी घेऊन येत असताना अज्ञात वाहनाने समोरून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पित्याचा जागीच ठार झाला तर त्याची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात राजापूर जवळे रस्त्यावर शुक्रवारी दुपारी ३.३० च्या सुमारास घडला.

याबाबत माहिती अशी कि, विश्वनाथ दगडू हासे वय ४७ रा. राजापूर हे संगमनेर येथे कॉलेज मध्ये शिक्षण घेत असलेल्या आपल्या मुलीला ऋतुजा विश्वानाथ हासे हिला कॉलेज मधून घरी घेऊन येत असताना राजापूर जावळे कडलग रस्त्यावर समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या  धडकेत विश्वनाथ हासे व त्याची मुलगी ऋतुजा हे गंभीर जखमी झाले. आजूबाजूंच्या नागरिकांना तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना संगम्नेरातील तांबे रुग्णालयात दाखल केले, मात्र विश्वानाथ हासे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर ऋतुजा हिला गंभीर मार लागल्याने तिला पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले.

अपघात घडल्यानंतर सदर वाह चालक वाहनासह फरार झाला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात  मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.


आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


HP DESKTOP
Hurry ! Discount Offer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here