Home अहमदनगर पत्रकार रोहिदास दातीर हत्याकांड: आरोपी महाराज बनून राहत होता, फिल्डिंग लावून अटक

पत्रकार रोहिदास दातीर हत्याकांड: आरोपी महाराज बनून राहत होता, फिल्डिंग लावून अटक

Rohidas Datir murder Accused was living as Maharaj arrested

राहुरी | Murder Case: राहुरी येथील पत्रकार राेहिदास दातीर यांच्या हत्या प्रकरणातील पोलिसांच्या ताब्यातून पसार झालेला कान्हू गंगाराम मोरे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिथापीने अटक केली आहे.

पत्रकार दातीर यांची आरोपी कान्हु मोरे व त्याच्या साथीदारांनी एप्रिल २०२१ मध्ये अपहरण करून हत्या केली होती. त्याबाबत राहुरी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल हाेता. या गुन्ह्यामध्ये कान्हु मोरे यास अटक करण्यात आली होती.

न्यायालयीन कोठडीत असताना त्यास काेविड झाला. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू हाेते. त्यानंतर २८ आॅगस्टला पुढील उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात जाण्यास सांगितले. पुणे येथे रुग्णवाहिकेतून घेऊन जाण्याची तयारी केली हाेती. त्याचवेळी बहाणा करून पोलिसांना गुंगारा देत आरोपी कान्हू माेरे पसार झाला. त्याप्रकरणी ताेफखाना पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

कान्हू माेरे याचा पसार झाल्यानंतर शाेध सुरूच हाेता. सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, उपनिरीक्षक सोपान गोरे यांचे पथक शोध घेत असताना कान्हू माेरे याला मध्यप्रदेश येथील बडवा जिल्ह्यात राहत असल्याची माहिती मिळाली. परंतु ताे तेथून पसार झाला. परंतु त्याला मदत करणारे त्याचे नातेवाईक श्रीकांत कचरू मरकड (रा. निवडुंगे, ता. पाथर्डी आणि सतीश श्रीकांत हरिचंद्र (रा. धामोरी खुर्द, ता. राहुरी) या दाेघांनाही ताेफखाना पाेलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, कान्हू माेरे हा राहुरीतील गुहा फाट्याजवळ एका मंदिरात वेशांतर करून राहत असल्याची माहिती निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यानंतर पथकाने तेथील मंदिराला सापळा लावून माेरे याला ताब्यात घेतले. ताेफखाना पाेलिसांकडे माेरे याला वर्ग करण्यात आले आहे.

Web Title: Rohidas Datir murder Accused was living as Maharaj arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here