Home अहमदनगर विश्वास संपादन करून कांदा व्यापाऱ्याची ३४ लाख रुपयांची फसवणूक

विश्वास संपादन करून कांदा व्यापाऱ्याची ३४ लाख रुपयांची फसवणूक

Crime News Onion trader cheated of Rs 34 lakh

अहमदनगर | Ahmednagar | Crime News: शहरातील कांदा विश्वास संपादन करून आंध्र प्रदेशमधील तिघांनी गंडा घालत 34 लाख 2 हजार 947 रूपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.  नितीन दत्तात्रय चिपाडे (वय 39 रा. सारसनगर) असे फसवणूक झालेल्या व्यापार्‍याचे नाव आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात बी. रामकृष्णा, पंचदरला रमणा, जी. सन्यासी राजू (तिघे रा. गाजुवाका, जि. विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश) यांच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सन 2019 मध्ये फिर्यादी चिपाडे यांची बी. रामकृष्णा, त्याचा कारभार पाहणारे पंचदरला रमणा, जी. सन्यासी राजु यांच्याशी ओळख झाली. या ओळखीतून चिपाडे यांनी 18 जून 2020 रोजी ट्रकने 25 टन कांदा रामकृष्णा याला पाठविला. चिपाडे यांना रामकृष्णा याने 25 टन कांद्याची रक्कम टप्प्याटप्याने पाठविली. यादरम्यान त्याने विश्वास संपादन केला. 22 जून 2020 ते 6 सप्टेंबर 2021 पर्यंत त्यास 40 ट्रक कांदा प्रत्येकी 25 टन असा एकूण 10 लाख टन कांदा त्यास पाठविला.

या मालाची एकूण किंमत 2 कोटी 6 लाख 91 हजार 447 रूपये इतकी झालेली असताना त्याने टप्पाटप्प्याने 1 कोटी 72 लाख 88 हजार 500 रूपये आरटीजीएस व बँक खात्यात जमा केले. उर्वरीत 34 लाख 2 हजार 947 रूपयांची रक्कम दिली नाही. त्याच्याशी वेळोवेळी संपर्क केला असता तसेच त्याच्या गावी जावून भेटलो असता त्याने रक्कम न देता फसवणूक केली आहे,असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक  तपास कोतवाली पोलीस करीत आहे.

Web Title: Crime News Onion trader cheated of Rs 34 lakh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here