धावत्या एसटी बसला आग (Fire) लागल्याची घटना नाशिक उपनगरात घडली.
नाशिक: नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये धावत्या एसटी बसला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेने प्रवाश्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये एकच भीतीचे वातावरण पसरले होते. याआधी देखील बस ला आग लागून झालेल्या दुर्घटनेत अनेक प्रवाश्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या उपनगर परिसरात राज्य परिवहन महामंडळाच्या धावत्या एसटी बसला आग लागली. या घटनेने प्रवाश्यामंध्ये एकच भीती पसरली. नाशिकहून प्रवाश्यांना घेऊन ही बस शिर्डीकडे जात होती.
उपनगर परिसरात ही बस पोहोचताच बसमधून धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने तात्काळ प्रसंगावधान राखत बस थांबवून तात्काळ प्रवाश्यांना खाली उतरून दिले.तर खबरदारी म्हणून यावेळी नाशिक-पुणे रोड वरील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती.
बसचा चालक आणि वाहकाच्या तात्काळ बस ला आग लागल्याची बाब लक्षात आल्याने त्यांच्या प्रसंगवधना मुळे मोठा अनर्थ होता होता टळला आहे. याबाबत तात्काळ अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून या आगीवर नियंत्रण मिळवले. यामुळे नागरिकांनी एकच सुटकेचा निश्वास घेतला.
Web Title: running bus from Nashik to Shirdi catches fire
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App