Home महाराष्ट्र विहिरीत हात व पाय दोरीने बांधलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ, आत्महत्या की...

विहिरीत हात व पाय दोरीने बांधलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ, आत्महत्या की घातपात

महिला मजूर यांनी विहिरीत डोकावून बघितले असता विहरीत प्रेत आढळून आले, मृतदेहाचे हात व पाय दोरीने बांधून दिसले असून हि आत्महत्या (Suicide) आहे की घातपात आहे असा संशय. या घटनेने खळबळ उडाली आहे.

suicide or accident due to the discovery of a dead body in a well 

वर्धा: पवनार येथील युवा शेतकरी प्रवीण रामेश्वर बोरकर (वय 42 वर्षे वॉर्ड क्र. १ पवनार ता.जि.वर्धा) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून प्रवीण हा रोज मौजा केदारवाडी शेतशिवरातील शेतात मालाच्या रखवाली करिता जात होता. रोजच्या प्रमाणे दि. 24 फेब्रुवारीच्या रात्री ८.३० वाजता रोजच्या प्रमाणे शेतात आला होता, सकाळी घरी लवकर आला नसल्याने पत्नीने फोनद्वारे संपर्क साधला परंतु फोन रिसिव होत नसल्याने परिसरात शोधाशोध सुरू केली मात्र कुठेही दिसून आला नाही.

शेतातील महिला सकाळी कामासाठी गेल्या असता महिलांना या बाबत माहिती देण्यात आली. महिला मजुरांनी विहिरी जवळ येवून बघीतले असता विहिरी जवळ मोबाईल, कपडे,चपला,स्वेटर व टॉर्च असे साहित्य आढळून आले त्या मुळे संशय अधिक बळावून आला महिला मजूर यांनी विहरित डोकावून बघितले असता विहरीत प्रेत आढळून आले, त्यामुळे घटनेची माहिती सेवाग्राम पोलिसांना देण्यात आली असता तत्काळ सेवाग्राम पोलिसांनी घटना स्थळी दाखल होऊन सदर घटनेचा पंचनामा केला. मृतदेहाचे हात व पाय दोरीने बांधून दिसले असून हि आत्महत्या आहे की घातपात आहे असा संशय व्यक्त होत आहे. सदर मृतक प्रवीण हा दोन वर्षांपासून होत असलेल्या नापिकिने व आजाराने त्रस्त असल्याचेही सांगण्यात येत आहे. सदर मृतदेह उत्तरीय तपासणी करीता सेवाग्राम रुग्णालय इथे पाठविण्यात आला असून त्याच्या पाठीमागे एक मुलगी, एक मुलगा,पत्नी, आई वडील असा परिवार आहे. सदर घटनेचा पुढील तपास सेवाग्राम ठाण्याचे पी. एस.आय कदम, पोलीस कॉन्स्टेबल,संदीप चोर, होमगार्ड सहायक कडू करीत आहे.

Web Title: suicide or accident due to the discovery of a dead body in a well 

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here