Home अकोले आयुष्य हेच संघर्ष आहे, नाउमेद न होता तुमचे प्रयत्न चालू ठेवा- अॅड....

आयुष्य हेच संघर्ष आहे, नाउमेद न होता तुमचे प्रयत्न चालू ठेवा- अॅड. एम.एन. देशमुख

Rajur News | Prize Distribution Ceremony: विद्यार्थ्यांनी आपली तुलना ऑलम्पिकमधील खेळाडूंबरोबर करून स्वत:मध्ये बदल केला पाहिजे, त्यातून आपण कुठे आहेत, हे तपासणे गरजेचे असल्याचेही अॅड. एम. एन. देशमुख.

S V M annual prize distribution ceremony Rajur 

राजूर: ज्या विद्यार्थ्यांना बक्षिसे मिळाली आहेत त्यांचे प्रथम अभिनंदन, आणि ज्या विद्यार्थ्यांना बक्षिसे मिळाली नाहीत त्यांनी नाउमेद होऊ नये कारण आयुष्य हेच संघर्ष आहे आणि अपयशातून मिळालेलं यश हे आपल्याला खूप आवडत खूप भावतं आणि सहजा सहजी मिळालेलं यश विसरून जातं, त्यामुळे नाउमेद न होता तुमचे प्रयत्न चालू ठेवा असे मत सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड. देशमुख यांनी गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय राजूर येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात व्यक्त केले.  

कोणीही आपल्या मनामध्ये न्यूनगंड आणू नये. आपला भाग हा आदिवासी भाग आहे. मी आदिवासी आहे. मागासलेल्या समाजाचा आहे. त्यामुळे मला शहरामध्ये काही मान सन्मान मिळेल की नाही. आपल्या याच शाळेत शिकून मुले उच्च पदावर काम करीत आहे त्यांचा तुम्ही आदर्श घ्यावा. आपण सर्वांनी ग्रामीण भागातून आलेल्या कविता राऊतचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन पुढे गेले पाहिजे. विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे. संस्था, जिल्हा, राज्य स्तरावर विविध स्पर्धांमध्ये पाहिले येणे पुरेस नाही, अशा विद्यार्थ्यांनी आपली तुलना ऑलम्पिकमधील खेळाडूंबरोबर करून स्वत:मध्ये बदल केला पाहिजे, त्यातून आपण कुठे आहेत, हे तपासणे गरजेचे असल्याचेही अॅड. देशमुख यावेळी म्हणाले.

शैक्षणिक, सांस्कृतिक व खेळ प्रकारात आपला ठसा उमटवणाऱ्या २७८ विद्यार्थ्यांना यावेळी गौरविण्यात आले. तसेच संस्थेअंतर्गत घेण्यात आलेल्या मॅरेथोन, समूह गायन, वत्कृत्य स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. प्रमाणपत्र, रोख रक्कम व बक्षिसे देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय स्थानी अॅड. एम.एन.देशमुख होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप प्राचार्य बी. एन. ताजणे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षक मधुकर मोखरे यांनी सुशब्दात करून दिला.

जसे आपले धार्मिक सण असतात तसेच स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ हा वार्षिक गुण गौरव करणारा सण आहे असे मत सत्यनिकेतन संस्थेचे संचालक मिलिंद उमराणी यांनी व्यक्त केले.  

विद्यालयाचा वार्षिक अहवाल प्राचार्य एम. डी. लेंडे यांनी सादर करीत विद्यार्थी हाच आमचा आरसा आहे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धा व उपक्रम राबविले जातात असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

या कार्यक्रमप्रसंगी सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड. देशमुख, कोषाध्यक्ष विवेकजी मदन, डॉ. निता भारमल, निसर्ग कवी तुकाराम धांडे, सत्यनिकेतन संस्थेचे संचालक मिलिंद उमराणी, एस.टी. येलमामे, व्ही. टी. पाबळकर, विजय पवार,  माजी प्राचार्य बारेकर सर, माजी मुख्याध्यापक अंतुराम सावंत, सौ. सावंत, प्राचार्य एम. डी. लेंडे, उप प्राचार्य बी. एन. ताजणे, पर्यवेक्षक मधुकर मोखरे, स्वप्नील धांडे आदी पाहुणे उपस्थित होते.

Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा

या कार्यक्रमाचे आयोजन सदाशिव गिरी यांनी केले तर सुत्रसंचालन संतराम बारवकर यांनी केले. बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचे वाचन डी. बी. पगारे, आर.डी. साबळे, बी.एस. घिगे, व्ही.टी.तारू यांनी केले. यावेळी आभार विजय पवार यांनी मानले. सदर कार्यक्रम अखेर सर्व मान्यवर विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी भोजन केले. प्राचार्य एम. डी. लेंडे यांच्या प्रयत्नातून सर्वाना जेवण देण्यात आले. यावेळी जालिंदर आरोटे आणि संतोष नवले यांनी विशेष असे सहकार्य केले.

हा कार्यक्रम यशस्वितेसाठी बी. व्ही. भोसले, सौ. व्ही. के. सोनवणे, दिपक बुऱ्हाडे,  भाऊसाहेब बनकर, दीपक पाचपुते, संजय व्यवहारे, आर. पी. पांडे, के. व्ही. देशमुख, जी. एल. शिंदे, शरद तुपविहीरे, सौ. बिना सावंत, एस. एन. वाकचौरे, अजित गुंजाळ, विकास जोरवर, सुधीर आहेर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.     

Web Title: S V M annual prize distribution ceremony Rajur 

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here