Home महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी सदाभाऊ खोत यांचा उमेदवारी अर्ज दाखल

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी सदाभाऊ खोत यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Sadabhau Khot's candidature application filed for the Legislative Council elections

मुंबई: सहाव्या जागेसाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे अपक्ष उमेदवार असून त्यांना भाजपनं समर्थन दिल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने पाच उमेदवारांची नावे जाहीर केली. भाजपच्याच नेत्यांना उमेदवारी दिल्याने मित्रपक्षांनी भाजपवर प्रचंड नाराजी व्यक्त केली होती.शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे  यांनी तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटून जाहीर नाराजीही व्यक्त केली. सहाव्या जागेसाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

आधीच पाचव्या उमेदवाराला मते कमी पडत असताना भाजपने सदाभाऊ खोत यांना निवडणूक मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. भाजपच्या पाच अधिकृत उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर खोत यांनीही आज अर्ज दाखल केल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. मतांची जुळवाजुळव कशी होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Web Title: Sadabhau Khot’s candidature application filed for the Legislative Council elections

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here