Home अहमदनगर साई संस्थानच्या सीईओ बानायत यांची बदली

साई संस्थानच्या सीईओ बानायत यांची बदली

Ahmednagar Breaking Sai Sansthan CEO Banayat transferred: उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्याकडे सोपविण्याचे निर्देश .

Sai Sansthan CEO of Banayat transferred

शिर्डी: साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांची बदली करण्यात आली आहे त्यांना या पदाचा कार्यभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्याकडे सोपविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज, मंगळवारी सायंकाळी संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांच्या बदलीचा आदेश काढला विदर्भ वैधानिक विकास महामंडळाच्या सदस्य सचिव या रिक्त असलेल्या जागेवर बानायत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरीता अतिशय उपयुक्त असे इंग्रजी व्याकरण अभ्यासण्यासाठी आवश्यक असे मोफत स्टडी मटेरीअल….  

Earn Money Online | या पाच मार्गाद्वारे तुम्ही महिन्याला २५ ते ३० हजार ऑनलाईन कमवू शकता!!!

बानायत यांनी ६ सप्टेंबर २०२१ रोजी तत्कालीन सीईओ कान्हुराज बगाटे यांच्याकडून कार्यभार स्वीकारला होता जवळपास चौदा महिन्यांत त्यांची बदली करण्यात आली आहे. साई समाधीला हस्त स्पर्श करुन दर्शन व द्वारकामाई मंदिर दर्शनासाठी खुले करण्याचा महत्वाचा निर्णय बानायत यांच्या काळात झाला. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक शिर्डीकरांची नाराजी होती. त्यामुळे बदली होताच पेढे वाटप झाले.

त्यांच्या जागेवर डॅशिंग अधिकारी अशी ओळख असलेले तुकाराम मुंडे (Tukaram Munde) यांची नियुक्ती झाल्याची चर्चा होती. याबाबतची यादीही सोशल मीडियावर फिरत होती. पण नंतरच्या आदेशात त्यांची नियुक्ती प्रतीक्षाधिन असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे बानायत यांच्या जागी मुंडे की आणखी कुणी? याबाबतची उत्सुकता लागली आहे.

Web Title: Sai Sansthan CEO of Banayat transferred

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here