Home अहमदनगर अहमदनगर: सिमेंटचा ब्लॉक डोक्यात घालून महिलेचा खून- Murder

अहमदनगर: सिमेंटचा ब्लॉक डोक्यात घालून महिलेचा खून- Murder

Ahmednagar  Murder Case: रेल्वेस्टेशनच्या पश्चिमेस असणार्‍या मोकळ्या पडीत शेतात एका 35 ते 40 वर्षे वयोगटातील महिलेचा मृतदेह आढळून आला.  सिमेंटचा ब्लॉक डोक्यात घालून खून केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

a woman was Murder by putting a cement block on her head

अहमदनगर:  सिमेंटचा ब्लॉक डोक्यात घालून महिलेचा खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी समोर आली आहे.  महिलेचा मृतदेह इंगळे वस्ती, रेल्वे स्टेशन ते आगरकरमळा जाणारे रोडवर मोकळ्या पडीत शेतामध्ये आणून टाकला होता. दरम्यान महिलेची ओळख पटली नसून कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Earn Money Online | या पाच मार्गाद्वारे तुम्ही महिन्याला २५ ते ३० हजार ऑनलाईन कमवू शकता!!!

याबाबत पोलीस अंमलदार संदीप हेमंत थोरात यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी सकाळी इंगळे वस्ती, रेल्वेस्टेशनच्या पश्चिमेस असणार्‍या मोकळ्या पडीत शेतात एका 35 ते 40 वर्षे वयोगटातील महिलेचा मृतदेह शोभा इंगळे (रा. इंगळे वस्ती, रेल्वेस्टेशन) यांच्या निदर्शनास आला. त्यांनी नगरसेवक प्रशांत गायकवाड यांना माहिती दिली. त्यांनी कोतवाली पोलिसांना माहिती कळविली.

इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरीता अतिशय उपयुक्त असे इंग्रजी व्याकरण अभ्यासण्यासाठी आवश्यक असे मोफत स्टडी मटेरीअल….  

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांना इंगळे वस्ती ते आगरकर मळा जाणार्‍या रोडच्या पश्चिमेस रस्त्यापासून सुमारे 100 ते 150 मीटर अंतरावर आतमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला. सदर महिलेचा चेहरा हा रक्ताने माखलेला होता.

तसेच तिच्या चेहर्‍याच्या डाव्या बाजूने गालावर तसेच डोळ्याच्या व कानाच्यामध्ये जखम दिसत होती. मृतदेहा शेजारी एक सिमेंट ब्लॉक पडलेला होता. त्याला सुध्दा रक्त लागल्याचे दिसून आले. अज्ञात इसमाने काहीतरी कारणावरून सिमेंटचा ब्लॉक डोक्यात घालून खून केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तिचा कोणत्या कारणातून खून झाला याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी दोन पथके नियुक्त केली असून त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: a woman was Murder by putting a cement block on her head

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here