Home अहमदनगर प्रेयसीसोबत राहू दिले जात नाही म्हणून सरपंचाचे धक्कादायक पाउल

प्रेयसीसोबत राहू दिले जात नाही म्हणून सरपंचाचे धक्कादायक पाउल

Ahmednagar: जिल्हाधिकारी कार्यालयातील घटना : पोलिसांनी घेतले ताब्यात, रुग्णालयात उपचार, प्रेयसीसोबत राहू दिले जात नाही म्हणून सरपंचाचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

Sarpanch's shocking comments as he is not allowed to stay with his girlfriend

अहमदनगर: विवाहित प्रेयसीसोबत राहू दिले जात नाही. दोघांना त्रास दिला जातो. आम्ही दोघेही एकमेकांशिवाय जगू शकत नाहीत, असे निवेदन लिहून जिल्हाधिकारी कार्यालयातच विष प्राशन करून श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी येथील सरपंच अविनाश मिस्टर चव्हाण (वय २६) याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (दि.२९) सकाळी घडली.

अविनाश चव्हाण हा सुमारे अडीच वर्षापूर्वी घोटवी गावाचा सरपंच झाला होता. त्याचदरम्यान त्याचे एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले. घेतले. ही बाब गावातील काही लोकांना व तिच्या नवऱ्याला समजली. तिचा नवरा तिला मारहाण करीत असे. मारहाण सुरूच राहिली. नवऱ्याने तिला माहेरी नेऊन घातले होते. नवरा मारहाण करीतच होता. त्यामुळे अविनाश याने त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु तिला करीत असल्याचे व माहेरी आणून सोडल्याचे त्या प्रेयसीने अविनाशला फोनवरून सांगितले होते.

त्यानंतर दोघांनीही पळून जाण्याचा निर्णय घेतला;  आम्ही एकमेकांशिवाय जगू शकत नाही, असे नातेवाइकांना सांगत होते. मात्र, नातेवाइकांकडून दोघांनाही त्रास सुरूच होता. त्यामुळे अविनाश याने केला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन लिहून ते द्यायला तो मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आला होता. तो जिल्हाधिकारी कार्यालयातील पाचव्या मजल्यावर पोहोचला. लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर तेथेच त्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

ही माहिती समजताच जिल्हाधिकारी कार्यालयातील पोलिस जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, हवालदार आय. एफ. शेख यांनी त्याला प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात पालथे पाडून पोटातील विष बाहेर आले.

■ अविनाश हा आपल्या विवाहित प्रेयसीसोबत १८ ऑगस्टपासून पळून गेला होता.

■ याबाबत बेलवंडी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

 ■ त्याचा दोन महिने शोध घेऊनही तो कोठे आढळून आला नाही.

■ त्यामुळे ८ ऑक्टोबर रोजी त्याच्या भावांनी अविनाशला शोधून देणाऱ्यास २१ हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते.

अविनाश करीत होता एमपीएससीची तयारी

अविनाश हा पारधी समाजाचा असून त्याचे एम. ए. पर्यंतचे शिक्षण झाले आहे. तसेच तो एमपीएससीचा अभ्यास करीत होता. त्याला क्लास वन अधिकारी होण्याची इच्छा होती, असे त्याने लिहिलेल्या निवेदनात नमूद आहे.

Web Title: Sarpanch’s shocking comments as he is not allowed to stay with his girlfriend

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here