Home संगमनेर संगमनेर: समनापुरचा मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

संगमनेर: समनापुरचा मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

Samanapur Mandal officer caught in bribery trap 

संगमनेर | Bribery: तालुक्यातील समनापूर येथे तक्रारदाराच्या खरेदी खतात चुकून एक नोंद झाली होती. ती दुरुस्थी करण्यासाठी मंडल अधिकारी बाबासाहेब जाधव याने तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअखेर आठ हजार देण्याचे ठरले.जाधव यांचा हस्तक मनोज मंडलिक याचादेखील यामध्ये समावेश होता.

नगरच्या लाचलुचपत विभागाने या दोघांना ८ हजारची लाच घेताना रंगेहाथ पकडले. समनापुर येथे सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. नाशिक विभागचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली नगर लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक हरीश खेडकर व पोलीस निरीक्षक श्याम पवरे व पोलीस कर्मचारी या पथकाने ही कारवाई केली.

समनापूर येथील तक्रारदाराच्या खरेदी खतात एक चुकून नोंद झाली होती. ती चुकीची नोंद दुरुस्थी करण्यासाठी किंवा ती नोंद न करण्यासाठी लाचखोर जाधव याने १० हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार यांच्या मागणीला वैतागून त्यांनी थेट नगरचे अधिकारी हरीश खेडकर यांना माहिती दिली, पथकाने सापळा रचत दोघांना बेड्या ठोकल्या अधिक सखोल तपास सुरु आहे.    

Web Title: Samanapur Mandal officer caught in bribery trap 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here