Home अकोले माहेरून फ्लॅट घेण्यासाठी 5 लाख रुपये आण, अकोलेतील नवविवाहितेचा छळ

माहेरून फ्लॅट घेण्यासाठी 5 लाख रुपये आण, अकोलेतील नवविवाहितेचा छळ

Crime News Persecution of newlyweds in Akole

अकोले | Crime News: अकोले तालुक्यातील नवविवाहितेला तुला स्वयंपाक नीट येत नाही, माहेरून फ्लॅट घेण्यासाठी 5 लाख रुपये आण, सोन्याचे दागिने घेऊन ये अशी अपमानास्पद वागणूक देत शिवीगाळ व दमदाटी तसेच शरीराक व मानसिक छळ केल्याने टिटवाळा व चाकण येथील कुटुंबीयाविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

याबाबत रोहिणी निलेश डोंगरे रा. कौठठे बुद्रुक ता. संगमनेर हल्ली रा. वाघापूर ता. अकोले यांनी अकोले पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

विवाहीता ही लग्न झाल्यानंतर सासरी टीटवाळा जि. ठाणे येथे नांदत असताना लग्न झाल्यानंतर दोन महिन्यांतच पती निलेश सुदाम डोंगरे यांनी फ्लॅट घेण्यासाठी माहेरुन 5 लाख रुपये घेऊन ये असे म्हणून तसेच भाया अशोक सुदाम डोंगरे, जाव दिपाली अशोक डोंगरे यांनी तुला स्वयंपाक नीट येत नाही असे म्हणून अपमानास्पद वागणूक देऊन तसेच सासू ताराबाई सुदाम डोंगरे, सासरे सुदाम निवृत्ती डोंगरे यांनी फिर्यादीस माहेरून पैसे आणत नाही म्हणून वाईट वाईट शिवीगाळ करून मारहाण केली. या फिर्यादीवरून अकोले पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अधिक तपास  पोलिस नाईक के. एल. तळपे करत आहेत.

Web Title: Crime News Persecution of newlyweds in Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here