Home संगमनेर संगमनेर: माहुली घाटात ६० फुट दरीत कार कोसळली, कारने घेतल्या पाच पलटी

संगमनेर: माहुली घाटात ६० फुट दरीत कार कोसळली, कारने घेतल्या पाच पलटी

Sanagmner car crashed in a 60 feet valley in Mahuli Ghat

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावर माहुली घाटात ६० ते ६५ फुट खोल दरीत कार कोसळल्याची घटना घडली आहे. या काराने तब्बल पाच पलटी घेतल्या. ही घटना रविवारी ७ मार्च रोजी सकाळी सहा वाजता घडली. या कारमध्ये तिघे जण होते. दैवबलवत्तर म्हणून हे तिघे जण बचावले आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी की, देवदर्शनासाठी गुजरात येथून भीमाशंकराला जात असणाऱ्या तीन तरुणांचा अपघात झाला. सकाळी सहा वाजेच्या सुमारास माहुली घाटातून ही कार जात असताना चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने कार थेट महामार्ग सोडून ६० ते ६५ फुट खोल दरीत कोसळली. यावेळी कारने जवळपास पाच पलटी घेतल्या. याठिकाणी मोठ मोठे दगडही आहेत. केवळ दैवबलवत्तर हे तिघे तरुण बालंबाल बचावले आहे. या अपघातात कारचा अगदी चक्काचूर झाला आहे.

कार पलटी झाल्याचे समजताच महामार्ग पोलीस व घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  काही दिवसांपूर्वी या ठिकाणी मालवाहू ट्रक पलटी झाला होता.

Web Title: Sanagmner car crashed in a 60 feet valley in Mahuli Ghat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here