Home अहमदनगर प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीच्या घरच्यांकडून तरुणावर हल्ला

प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीच्या घरच्यांकडून तरुणावर हल्ला

Nevasa man attacked by girl's family out of anger over love marriage

नेवासा | Nevasa: मुलीसोबत प्रेमविवाह केल्याने मनात राग धरून नेवासा येथील तरुणावर हल्ला करीत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांसह दहा जणांवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामधील सात जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडील हत्यारे जप्त करण्यात आली आहे.

नेवासा येथील प्रशांत राजेंद्र वाघ याने पाथर्डी येथील ऋतुजा माणिक खेडकर यांनी १ मार्चला आंतरजातीय विवाह केला. या विवाहास मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. मुलीचे वडील यांनी मुलीला सोबत पाठवा अशी प्रशांत याला धमकी दिली होती.

नेवासा शहरातील कडूगल्ली येथे शनिवारी दुपारी वाघ यांच्या घरासमोर ३ ते ४ चार चाकी वाहने आली. ही वाहने सातत्याने प्रशांतच्या घरासमोर वारंवार चकरा मारत होती.हा सर्व प्रकार प्रशांतची आई व भावाने पाहिले. यामधील एका कारमधून मुलीचे वडील माणिक खेडकर व भाऊ ऋषिकेश खेडकर व इतर अनोळखी इसम या गाडीतून उतरले. यावेळी दरवाजासमोर उभा असलेल्या प्रशांतवर गुप्तीने वार केला. हा वार मोटारसायकलवर गेला. प्रशांत घरात ओरडत पळाला. यावेळी माणिक खेडकर यांच्या भावाच्या हातात पिस्तुलसारखे हत्यार होते. त्यांनी ते प्रशांतच्या दिशेने रोखले होते. त्याच बरोबर कारमधून उतरलेल्या इतर इसमांच्या हातात चाकू, पिस्तुल लोखंडी रॉड, एअरगण होते. माणिक खेडकर याला सोडू नका मारा असे ओरडत होते.

या अचानक झालेल्या गोंधळामुळे गल्लीमधील लोक जमा झाले. जमलेले लोक पाहून सर्व जण कारमधून बसून पळून गेले. ते नेवासा फाट्याच्या दिशेने पळाले. प्रशांत ताबोडतोब पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी लगेच तत्परता दाखवत शेवगाव रस्त्यावरील भानसाहिवरा शिवारात हॉटेल सावताजवळ आरोपींना पकडले.

यामध्ये मुलीचे वडील माणिक खेडकर, ऋषिकेश खेडकर, माणिक खेडकर यांचा भाऊ व एक अनोळखी इसम पळून जाण्यात यशस्वी झाले. आरोपिंविरुद्द जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडील हत्यारे जप्त करण्यात आली आहे.

Web Title: Nevasa man attacked by girl’s family out of anger over love marriage

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here