Home संगमनेर संगमनेर: वाळू माफियांना दणका: २० लाखांच्या जेसीबीसह १५ ब्रास वाळूचा साठा केला...

संगमनेर: वाळू माफियांना दणका: २० लाखांच्या जेसीबीसह १५ ब्रास वाळूचा साठा केला जप्त

संगमनेर: महसूल विभागाची कारवाई, २० लाख रुपये किमतीचा जेसीबी जप्त.

Sand mafia busted 15 brass sand stocks seized along with JCB worth 20 lakhs

संगमनेर:  संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील प्रवरानदी पात्रात अवैधरित्या वाळूचा उपसा करताना महसूल विभागाने जेसीबीसह १५ ब्रास वाळूचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई रविवार (ता.३०) एप्रिल रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास केली आहे. अंदाजे २० लाख रूपये किंमतीचा जेसीबी आहे.

याबाबत महसूल विभागाने दिलेली माहिती अशी की, खांडगाव येथील प्रवरानदी पात्रात चेतन साकुरे हा जेसीबीच्या माध्यमातून अवैधरित्या वाळूचा उपसा करत असल्याची माहिती गुप्त खबर्‍यामार्फत नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांना समजली होती. त्यामुळे रविवारी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्यांच्यासह तलाठी रामदास मुळे, बाबासाहेब नरवडे, युवराजसिंग जारवाल हे सर्वजण वरील ठिकाणी गेले. यावेळी महसूल पथकाला पाहून चालक हा जेसीबी घेऊन पळून चालला होता. मात्र महसूल पथकाने पाठलाग करुन जेसीबी पकडला आहे.त्यानंतर हा जेसीबी संगमनेर येथील पोलिस वसाहतीत आणून लावला आहे.

त्याच बरोबर जेसीबीच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात वाळूचा साठा करून नदीपात्रालगच ढीग लावण्यात आला होता. आज सोमवार( ता.१) मे रोजी महसूल पथकाने प्रवरानदी पात्रात जावून उत्खनन केलेल्या वाळूचा पंचांच्या समक्ष पंचनामा केला आहे. अंदाजे वीस लाख रूपये किंमतीचा हा जेसीबी आहे. त्याच बरोबर वाळूची वाहतूक करणारे वाहने वाळूतस्करांनी घटनास्थळावरुन पळून नेली आहे. त्यामुळे नेमकी किती वाहने होती ते मात्र समजू शकले नाही. तसेच महसूल पथक या वाहनांवर कारवाई करणार आहे का? हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Sand mafia busted 15 brass sand stocks seized along with JCB worth 20 lakhs

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here