Home संगमनेर संगमनेर तालुक्याला आवकाळीने झोडपले, घरे, गोठ्यांवरील पत्रे उडाली

संगमनेर तालुक्याला आवकाळीने झोडपले, घरे, गोठ्यांवरील पत्रे उडाली

Sangamner News: आश्वी व परिसराला दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने झोडपले. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास उंबरीबाळापूर, मांची हिल परिसरात विजेच्या कडकडाटासह गारा पडल्या.

Sangamner taluka was hit by storms Rain, houses and cowsheds were blown away

संगमनेर: आश्वी व परिसराला दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने झोडपले. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास उंबरीबाळापूर, मांची हिल परिसरात विजेच्या कडकडाटासह गारा पडल्या. वादळाने घरे व गोठ्यांवरील पत्रे उडाली. भिंती खचल्या, तर अनेक ठिकाणी विजेचे पोल अन् झाडे उन्मळून पडली. तालुक्यातील गुंजाळवाडी परिसरात अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. तालुक्यातील विविध भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावत चांगलीच धांदल उडाली आहे.

येथील कारवाडी व चर्च परिसर तसेच शिंदे, रत्नाकर शेळके, बाळासाहेब आश्वी बुद्रुक मांची परिसरातील उंबरकर, विकास उंबरकर, सावळेराम सोन्याबापू भुसाळ, गोरक्षणाथ भुसाळ, भुसाळ, बाळासाहेब भुसाळ, संदीप बर्डे, नामदेव शेळके, प्रभाकर शेळके, किरण बर्डे, पूजा भुसाळ, गोरख विश्वनाथ शेळके, प्रकाश शेळके, कालेकर या शेतकऱ्यांच्या राहात्या आप्पासाहेब उंबरकर, गौतम उंबरकर, घरावरील जनावरांचा गोठ्यांवरील, सूर्यकांत शेळके, संजय उंबरकर, पोल्ट्री फार्मवरील पत्रे उडून गेली. काही घरावरील पत्रे उडाल्याने संसार.उघड्यावर आलेला आहे.

वादळी पावसाने उंबरीबाळापूर योगेश भुसाळ, खंडू होडगर, लक्ष्मण सोन्याबापू उंबरकर, घरांचा भिंती पडल्या. संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

तलाठी एस. एस. कटारे, पोलिस पाटील वैशाली मैड, संचालक रामभाऊ भुसाळ, सरूनाथ उंबरकर, अशिष शेळके, अशोक उंबरकर, डॉ. संजय कहार, गणेश खेमनर, दीपक शेळके यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेट देऊन नुकसानीचे पंचनामे केले.

Web Title: Sangamner taluka was hit by storms Rain, houses and cowsheds were blown away

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here