Home क्राईम तरुणीला घरी बोलवले, दिवसभर कोंडून ठेवत अत्याचार, मग मित्रांनाही बोलवलं

तरुणीला घरी बोलवले, दिवसभर कोंडून ठेवत अत्याचार, मग मित्रांनाही बोलवलं

Kalyan Crime: चार तरणांनी १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार (Rape) केल्याचा प्रकार उघडकीस, चौघांना ताब्यात घेतले.

young woman home, kept her locked up for the day rape

कल्याणः चार तरणांनी १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींपैकी एक अल्पवयीन असल्याचेही समोर आले आहे. कल्याणमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. साहिल राजभर असं मुख्य आरोपीचे नाव आहे.

तीन आरोपींना कल्याण येथील सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर अल्पवयीन मुलाची भिवंडी येथील सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, साहिल आणि तरुणीची आधीपासून ओळख होती. ज्या दिवशी घटना घडली तेव्हा आरोपीने पिडीत मुलीला त्याच्या घरी बोलावले होते. प्रेयसीमध्ये आणि त्याच्यात काही गैरसमज झालेत ते सोडवण्यासाठी घरी ये, असं म्हणत तिला घरी बोलावले. तसंच, त्याच्या अन्य तिन मित्रांनाही घरी बोलवले.

पिडीत तरुणी घरी आल्यानंतर राजभरने तिच्यावर बलात्कार केला. तसंच, तो पूर्णदिवस तिला घरात कोंडून ठेवले. व त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने त्याच्या तिन मित्रांनाही घरी बोलावले. त्यांनीही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आरोपींमध्ये १७ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

संध्याकाळी उशीरापर्यंत मुलगी घरी न परतल्याने तिच्या पालकांनी पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तर, आरोपींनी दुसऱ्या दिवशी मुलीची सुटका केली. तसंच, तिला घडलेल्या प्रकाराबाबत कुठेही वाच्यता करु नकोस, अशी धमकी दिली. पिडीत मुलगी आरोपींच्या तावडीतून सुटल्यानंतर पोलिसांनी ती कल्याण रेल्वे स्थानकाजवळ सापडली. त्यांनी तिची चौकशी केली असता तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: young woman home, kept her locked up for the day rape

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here