Nashik Murder Case: चार अज्ञात हल्लेखोरांनी एका टायर पंक्चरच्या दुकानात काम करणाऱ्यावर तीक्ष्ण हत्याराने (Murder) वार करून जागीच ठार केले.
नाशिक: चार अज्ञात हल्लेखोरांनी एका टायर पंक्चरच्या दुकानात काम करणाऱ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून जागीच ठार केल्याची घटना घडली आहे. नाशिक शहरात पुन्हा एकाचा खून झाल्याची घटना आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील जेजुरकर मळा टाकळी परिसरात शनिवारी रात्री घडली….
दरम्यान पोलिसांच्या वतीने गुन्हेगारांचा शोध सुरू असून सुमारे चार पथक गुन्हेगारांच्या मागावर गेल्याचे समजते. गुलाम रब्बानी असे मयत झालेल्या पंक्चर काढणाऱ्या युवकाचे नाव आहे. नाशिक छत्रपती संभाजीनगर रोडवर असलेल्या जेजुरकर लॉन्स जवळ रात्री आठच्या सुमारास ही घडला घडली. सूत्रांच्या माहितीप्रमाणे चार संशयितांनी तीक्ष्ण हत्याराने रब्बानीवर वार केले.
पोटात व डोक्यावर मार लागल्याने तो जागीच मृत्युमुखी पडला तर हल्लेखोर यांनी तेथून पळ काढला. दरम्यान घटनेची माहिती मिळतात पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी दाखल झाले होते. त्यांनी तपास अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी सुरू होती. पोलीस अधिक तपास करत आहेत.
Web Title: Murder of a youth with a sharp weapon
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App