Home Accident News संगमनेरात अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जोरात धडक दिल्याने दोघे जण ठार

संगमनेरात अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जोरात धडक दिल्याने दोघे जण ठार

Sangammer Accident Two people were killed when an unidentified vehicle 

संगमनेर | Accident News: संगमनेर खुर्द परिसरात बर्फ कारखान्याजवळ गुरुवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोटारसायकलवरील दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

या अपघातात मोटारसायकलवरील इरफान आयुब पठाण वय २४ रा. घुलेवाडी व आलिया नसीम सय्यद रा. लखमीपुरा या दोघांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत रमजान आयुब पठाण रा. घुलेवाडी याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत माहिती अशी की, इरफान आयुब पठाण हा आपल्या पल्सर मोटारसायकलवरून आलीया नसीम सय्यद हिला घेऊन जात होता. संगमनेर खुर्द जवळ आला असता भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात दोघानाही गंभीर मार लागल्याने दोघांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर वाहन चालक फरार झाला. पोलिसांना या घटनेची माहिती समजताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन अपघाताचा पंचनामा केला आहे.

Web Title: Sangammer Accident Two people were killed when an unidentified vehicle 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here