Home अहमदनगर खा. सुजय विखे रेमडेसिवीर प्रकरणाचा तपास डीवायएसपी संदीप मिटके यांच्याकडे सोपविला

खा. सुजय विखे रेमडेसिवीर प्रकरणाचा तपास डीवायएसपी संदीप मिटके यांच्याकडे सोपविला

Sujay Vikhe Remdesivir Case DYSP Sandip Mitake

Sujay Vikhe Remdesivir Case: खासदार विखे यांनी विशेष विमानाने रेमडेसिवीर इंजेक्शन आणल्याची चर्चा राज्यभर सुरु होती. सर्वसामान्य नागरिकांना इंजेक्शन मिळत नसताना खा. विखे यांनी एवढ्या मोठ्या संखेने कोठून व कसे आणले असा आक्षेप घेत काही जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिल्लीवरून विमानाने आणलेल्या इंजेक्शन प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी श्रीरामपूरचे पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे हा तपास सोपविला आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशावरून शिर्डी विमानतळावरील खासगी विमानाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यासाठी शुक्रवारी मिटके हे विमानतळावर दाखल झाले होते. या प्रकरणाच्या तपासाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Sujay Vikhe Remdesivir Case DYSP Sandip Mitake

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here