Home संगमनेर शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम प्रारंभ

शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम प्रारंभ

Sangamner a signature campaign to repeal anti-farmer laws

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे कॉंग्रेस पक्षातर्फे केंद्र सरकारने शेतकरी व कामगार विरोधी केलेले कायदे तातडीने रद्द करावे या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु करण्यात आली. या स्वाक्षरी मोहिमेस कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत दसऱ्याच्या दिवशी प्रारंभ करण्यात आला.

यावेळी थोरात म्हणाले शेतकरी व कामगारविरोधी केलेले काळे कायदे केंद्रसरकारने तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी कॉंग्रेस पक्षातर्फे दोन कोटी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत संगमनेर तालुक्यात एक लाख स्वाक्षरी मोहीम सुरु आहे. या मोहिमेअंतर्गत तळेगाव दिघे येथेही शेतकरी व कामगार विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत दसऱ्याच्या दिवशी मोहीम सुरु करण्यात आली.

यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते दत्तात्रय वाघ यांना कॉंग्रेस सेवादल जिल्हा संघटकपदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Sangamner a signature campaign to repeal anti-farmer laws

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here