होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासात मोठे योगदान मिळेल
अकोले | Virgaon: धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने विरगाव येथे रावसाहेब वाकचौरे व अनिल रहाणे यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या रुपाने लावलेले रोपटे त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आज आंतरभारती एज्युकेशन ट्रस्टच्या कॅम्पसमध्ये मातोश्री सुलोचना होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या इमारती चे भूमिपूजन करताना तालुक्याच्या वैभवात वाढ होणार आहे, याचा आनंद होत आहे अशी भावना माजी आमदार वैभवराव पिचड यांनी व्यक्त केली.
वीरगाव ता.अकोले येथील आंतरभारती रुरल इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन ट्रस्टच्या नियोजित मातोश्री सुलोचना होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल चे आज भूमिपूजन दस-याचे मुहूर्तावर माजी आमदार वैभवराव पिचड योगी केशवबाबा चौधरी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम पा गायकर यांचे हस्ते संपन्न झाले. कुदळी मारून भुमिपुजन केल्यानंतर माजी आ.बोलत होते. यावेळी जेष्ठ भाजपा नेते शिवाजी राजे धुमाळ, जि.प.सदस्य कैलासराव वाकचौरे, अशोकराव देशमुख, माणिक देशमुख, अमृतसागर दूध संघाचे संचालक भाऊ पाटील नवले, प्रवीण धुमाळ,कार्यकारी संचालक डॉ.सुजित खिलारी, रामदास आंबरे,भाजप तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे ,रामनाथ बापू वाकचौरे,महेश नवले,भाजप महिला जिल्हाध्यक्षा सोनाली नाईकवाडी ,इंजी.सुनील दातीर, कैलासराव शेळके, ,भाऊसाहेब वॉकचौरे,अरुण शेळके,अब्दुल इनामदार,राजेंद्र गवांदे, राहुल देशमुख, शंभू नेहे सुरेश नवले, स्वप्नील नवले, चंद्रशेखर आंबरे, अरुण कराड,जगन देशमुख, जावेद जहागीरदार, विठ्ठल थोरात, सुरेश साबळे, नाना थोरात बाळासाहेब मुळे,वसंत वाकचौरे, नवनाथ कुमकर, सयाजी टेमगिरे,रामराव वाकचौरे, प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, विश्वासराव आरोटे, हेमंत आवारी, विजयराव पोखरकर, अनिल नाईकवाडी, दादापाटील सावंत, संचालिका सुप्रिया वाकचौरे, गीता रहाणे, दिनेश वाकचौरे,प्राचार्य किरण चौधरी, प्राचार्या पल्लवी फलके, आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नियमाचे पालन करत मातोश्री सुलोचना होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज इमारती चे भूमिपूजन करण्यात आले.या कार्यक्रमास शुभेच्छा देताना माजी आ.पिचड पुढे म्हणाले की, वाकचाैरे व रहाणे यांनी आपले कुटुंब म्हणून ही शिक्षण संस्था चालवली आहे. अतिशय कष्ट घेऊन जिद्दीने अनेक प्रसंगाना तोंड देत ही संस्था आज तालुक्यातील प्रमुख नावाजलेली संस्था ठरली आहे.
हि संस्था आज तालुक्यात वैद्यकीय सेवा देणारे महाविद्यालय सुरु करत आहे. या महाविद्यालयाच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासात मोठे योगदान मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे यांनी केले तर सर्वाचे आभार सचिव अनिल रहाणे यांनी मानले. सुत्रसंचलन प्रा संदीप थोरात यांनी केले.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Virgaon Medical college and hospital innovation